मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : आर्थिक आवक चांगली राहील, या ५ राशींसाठी आनंदी व उत्साही दिवस

Today lucky zodiac signs : आर्थिक आवक चांगली राहील, या ५ राशींसाठी आनंदी व उत्साही दिवस

Priyanka Chetan Mali HT Marathi
Apr 06, 2024 12:27 PM IST

Lucky Rashi Today 6 April 2024 : आज ६ एप्रिल २०२४ शनिवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना दिवस आनंदी व उत्साही ठरेल. वाचा या कोणत्या राशी आहेत ज्यांना नशीबाची उत्तम साथ मिळेल.

लकी राशीभविष्य ६ एप्रिल २०२४
लकी राशीभविष्य ६ एप्रिल २०२४

आज शनिवार ६ एप्रिल रोजी, एक अद्भुत योगायोग घडत आहे, या दिवशी चंद्र शनिदेवाच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला प्रदोष तिथी व्रत पाळण्यात येणार आहे, ही तिथी शनिवारी येत असल्याने हे व्रत शनि प्रदोष व्रत म्हणून ओळखले जाईल. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्मयोग, लक्ष्मी योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोगही होत असल्याने आजचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने दिवस आनंदी व उत्साही जाणार आहे.

मिथुन: 

आज उत्कृष्ट कल्पनाशक्ती आणि अंतःस्फूर्तीच्या जोरावर जनमानसात प्रभाव पाडाल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. समस्या अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. रोजगारात मनासारखी बढती व बदली होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण समाधानाचे व आनंददायी राहील. आंनदाची बातमी मिळेल. मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभ होईल.

कर्क: 

आज आत्मविश्वास वाढेल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाच्या क्षेत्रात करिअर करणाऱ्यांना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील.  

सिंहः 

आज आनंदी व उत्साही राहाल. उत्तम सहकार्य मिळेल. हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. नवीन प्रकल्प हाती येतील. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. नोकरीत बढती मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. 

कन्या: 

आज नोकरी धंद्याच्या ठिकाणच्या आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली संधी मिळेल. घर वाहन खरेदीचा योग आहे. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. संवाद वाढेल. आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामंजस्य राहील. 

मीनः 

आज दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. वातावरणात चैतन्य निर्माण करू शकाल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलांकडून आर्थिक सहकार्य लाभेल. पदप्राप्ती आणि प्रतिष्ठा लाभेल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. 

WhatsApp channel