Lucky Zodiac Signs: आज रविवार ५ मे २०२४ रोजी वैशाख महिन्यातील कृष्ण पक्षाच्या त्रयोदशीची स्थिती आहे. हा योग जुळून येत असल्यामुळे प्रदोष तिथीत व्रत केला जाणार आहे. रवी प्रदोष उपवासादिवशीच चतुर्ग्रही योग, सर्वार्थसिद्धी योग आणि भाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग असे शुभ योग घडून येत आहेत. त्यामुळे या सर्वाचा राशीचक्रातील १२ राशींवर वेगवेगळा प्रभाव पडलेला दिसून येणार आहे. यातील पाच राशींवर हा परिणाम अतिशय सकारात्मक आणि शुभ असणार आहे. पाहूया या पाच राशी कोणत्या आहेत.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अतिशय सुखद असणार आहे. या लोकांना आज आपल्या मुलांकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण झालेल्या पाहायला मिळतील. मुलांची आपापल्या क्षेत्रात प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत नाती अधिक दृढ होऊन एकमेकांवरील प्रेम वाढेल. नवीन लोकांच्या संपर्कात याला. याचा सकारत्मक परिणाम तुमच्या उद्योग-व्यवसायावर होईल. हातात घेतलेल्या जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडाल. अनेक दिवसांपासून रखडलेले महत्वाचे काम आज पार पडेल. त्यामुळे मन उत्साही राहील. जुन्या मित्रांसोबत गाठीभेटी जुळून येतील. दिवस मित्रांसोबत मौजमस्ती करण्यात पार पडेल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असेल. मनात असलेल्या इच्छा आज पूर्ण होतील. महत्वाच्या कार्यात वडिलांकडून पूर्ण सहकार्य लाभेल. तसेच व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस फलदायी असणार आहे. मात्र तुमच्या कला कौशल्यांचा वापर योग्य पद्धतीने करावा लागेल. व्यवसायात अचानक धनलाभ होईल. आज रविवार सुट्टीचा दिवस मित्रांसोबत पूर्णपणे एन्जॉय कराल. त्यामुळे तुमच्यात एक वेगळाच उत्साह जाणवेल. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. पती पत्नीचे नाते सुधारेल. एकमेकांबाबत असलेले गैरसमज आज दूर होतील.
तूळ राशीसाठीसुद्धा आजचा दिवस शुभ असणार आहे. तुमच्यासाठी कमाईचे विविध मार्ग खुले होतील. त्यामुळे चांगला धनलाभ होऊन पैशांची बचत होईल. भागीदारीत व्यवसाय सुरु करण्यासाठी पैशांची गुंतवणूक कराल. हा व्यवसाय तुम्हाला फलदायीच ठरेल. वडिलांच्या मदतीने अनेक दिवसांपासून अडकलेले कार्य पूर्ण होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल त्याचा सकारात्मक परिणाम तुम्हाला येत्या काळात दिसून येईल. जमीन किंवा वाहन खरेदीची तुमची इच्छा पूर्णत्वास जाईल. एकंदरीत आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम असणार आहे.
धनु राशीसाठी आजचा दिवस सुफळ ठरणार आहे. धनु राशीवर आज सूर्यदेवाची कृपा असणार आहे. त्यामुळे रखडलेली कामे पूर्ण होणार आहेत. कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक केल्यास भविष्यात चांगला लाभ होण्याची शक्यता आहे. धार्मिक कार्यात रुची वाढेल. घरात लवकरच लग्नकार्य घडण्याची चिन्हे दिसून येत आहेत. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहील. एखाद्या जुनाट रोगापासून मुक्ती मिळेल आणि प्रकृती उत्तम होईल. कुटुंबासोबत धार्मिक स्थळाला भेट देण्याचा योग जुळून येईल.
वरील इतर चार राशींप्रमाणे कुंभ राशीलासुद्धा आजचा दिवस चांगला ठरणार आहे. तुम्हाला दिवसभर उत्साह जाणवेल. रविवार असल्याने एकदम जुन्या मित्राची भेट घडून येईल.अचानक झालेल्या भेटीमुळे भावनिक व्हाल. एखाद्या गोष्टीवर वडिलांसोबत असलेला वाद संपुष्ठात येऊन नातेसंबंध सुधारतील. भागीदारीत व्यवसाय सुरु केल्यास लाभ होईल. घरात विलासी वस्तूंची खरेदी होईल.
संबंधित बातम्या