Today lucky zodiac signs: धन योगासह मंगळ-शुक्र युती, या ५ राशींना दिवस प्रगतीचा, आनंदाची बातमी मिळेल
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: धन योगासह मंगळ-शुक्र युती, या ५ राशींना दिवस प्रगतीचा, आनंदाची बातमी मिळेल

Today lucky zodiac signs: धन योगासह मंगळ-शुक्र युती, या ५ राशींना दिवस प्रगतीचा, आनंदाची बातमी मिळेल

Updated Mar 05, 2024 01:40 PM IST

Lucky Rashi Today 5 march 2024: आज ५ मार्च २०२४ मंगळवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात या ५ राशींची प्रगती होईल.जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

लकी राशीभविष्य ५ मार्च २०२४
लकी राशीभविष्य ५ मार्च २०२४

आज मंगळवार ५ मार्च रोजी, चंद्र गुरू ग्रहाच्या धनु राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, धन योग आणि मूल नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मेष: 

आज कुटुंबात सुख-समाधानाचे वातावरण असेल. उत्तम बुद्धीचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय पथ्यावर पडेल. नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. 

कन्या: 

आज अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. तरुणांना प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद, मान-सन्मान, प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. आरोग्य उत्तम राहील. नवीन संधी चालून येतील.

तूळ: 

आज केलेल्या कष्टाचे चीज होईल. बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. सामाजिक मान सन्मान वाढेल. पुढील काळात आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडेल. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होऊ शकतो. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. मुलाखतीत यश मिळेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल.

वृश्चिकः 

आज उच्च शिक्षणासाठी अनेक संधी मिळतील. अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिनमान आहे. नशीबाची साथ लाभेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.

मीन: 

आज व्यवसाय वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसायातून उधारी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.

Whats_app_banner