Lucky Zodiac Signs : सुकर्मा योग 'या' ५ राशींसाठी अतिशय लाभाचा! पाहा आजच्या लकी राशी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : सुकर्मा योग 'या' ५ राशींसाठी अतिशय लाभाचा! पाहा आजच्या लकी राशी

Lucky Zodiac Signs : सुकर्मा योग 'या' ५ राशींसाठी अतिशय लाभाचा! पाहा आजच्या लकी राशी

Jun 05, 2024 10:06 AM IST

Lucky Rashi Bhavishya 5 June 2024 : आज बुधवार ५ मे २०२४ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्थदशी तिथी आहे. तसेच आज सुकर्मा योग आणि बुधादित्य योग आहे.

लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ५ जून २०२४
लकी राशीभविष्य, नशीबवान राशी ५ जून २०२४

आज बुधवार ५ मे २०२४ रोजी वैशाख कृष्ण पक्षातील चतुर्थदशी तिथी आहे. तसेच आज सुकर्मा योग आणि बुधादित्य योग आहे. या योगांचा राशीचक्रातील राशींवरसुद्धा मोठा प्रभाव दिसून येत आहे. यामध्ये काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळत आहेत. ग्रह-नक्षत्रांच्या या हालचालींमध्ये आज कोणत्या ५ राशी नशीबवान ठरत आहेत ते जाणून घेऊया.

मेष

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस अत्यंत लाभदायक असणार आहे. आज दिवसभर तुम्हाला एक वेगळाच आत्मविश्वास जाणवेल. उद्योग-व्यवसायात व्यवसायिकांना अनेक आर्थिक लाभ होतील. नोकरीमध्ये वरिष्ठ तुमच्या कार्यावर खुश होतील. एखाद्या महत्वाच्या कार्यात कुटुंबाची चांगली साथ लाभेल. वैवाहिक आयुष्यात सुख समृद्धी लाभले. कार्यक्षेत्रातील प्रसिद्ध लोकांच्या संपर्कात याल. त्यांच्याकडू उत्तम सहकार्य लाभेल.

मिथुन

बुधवारचा दिवस मिथुन राशीच्या लोकांसाठी लकी असणार आहे. नोकरदारवर्गाला नोकरीत बढती मिळण्याचा योग जुळून येत आहे. मनामध्ये योजिलेल्या गोष्टी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरु कराल. कोणत्याही क्षेत्रात आर्थिक गुंतवणुकीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज घरामध्ये मोठी खरेदी होईल. औद्योगिक क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला असणार आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात प्रगती दिसून येईल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल. महत्वाच्या निर्णयात पतिपत्नी एकमेकांना पाठिंबा देतील. कार्यक्षेत्रात वरिष्ठ तुमच्या कामावर खुश असतील.

सिंह

आज बुधवारच्या दिवशी सिंह राशीच्या लोकांना गजकेसरी योगाचा विशेष लाभ मिळणार आहे. मिळकतीचे विविध नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. उद्योग-व्यवसायात आणखी एखादा पार्टनर जोडण्यासाठी प्रयत्न कराल. पतिपत्नीच्या नात्यात गोडवा वाढेल. त्यामुळे नाते आणखी मजबूत होईल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. घरातील वातावरण खेळीमेळीचे असेल.

तूळ

आज बुधादित्य योगात तूळ राशींच्या लोकांसाठी शुभ दिवस असणार आहे. प्रत्येक क्षेत्रात आज तुम्हाला यश प्राप्त होईल. हातात घेतलेली महत्वाचे कामे विनाअडथळा पार पडतील. आज तुम्हाला भाग्याची विशेष साथ मिळणार आहे. विविध मार्गाने भरघोस कमाई करण्याची मोठी संधी तुम्हाला उपलब्ध होईल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे आज मार्गी लागतील. आज हर्शल योग तूळ राशीसाठी आर्थिकदृष्ट्या विशेष लाभ देणार आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस फायद्याचा असणार आहे. सुकर्मा योगाचा या राशीवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. या योगात आज व्यवसायिकांना मोठे प्रोजेक्ट हाती लागतील. भविष्यात त्यातून मोठा लाभ होण्याची चिन्हे आहेत. ज्या तरुण-तरुणींचे विवाह जुळण्यात अडचणी येत आहेत त्या आज दूर होतील. विवाह जुळून येतील. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असेल. कर्ज घेण्यासाठी प्रयत्न करत असाल तर त्यात यश येईल. आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक चांगली होईल. मन प्रसन्न राहील. वैवाहिक लोकांच्या आयुष्यात जोडीदाराबाबत प्रेम आणि आदर वाढेल.

Whats_app_banner