मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : विवाह आणि बढतीचे योग! 'या' ५ राशीच्या लोकांसाठी अमावस्येचा दिवस लकी राहील

Lucky Zodiac Signs : विवाह आणि बढतीचे योग! 'या' ५ राशीच्या लोकांसाठी अमावस्येचा दिवस लकी राहील

Jul 05, 2024 10:21 AM IST

Lucky Rashi Bhavishya 5 July 2024 : आज मासिक शिवरात्री असून,या दिवशी वृद्धी योग, गजकेसरी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांसाठी लकी ठरेल.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ५ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ५ जुलै २०२४

आज ५ जुलै २०२४ शुक्रवार रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असल्याने ही तिथी दर्श अमावस्या म्हणून ओळखली जाते. अमावस्येच्या दिवशी ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येचा दिवस ५ राशींना लकी राहणार आहे.

मेष: 

आज आनंदी दिवस आहे. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील, त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. मनातील संभ्रम दुर ठेवा. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. वैवाहीक जीवन सुखी राहील.

मिथुनः 

आज धनवृद्धी होईल. सुखसोयीच्या साधनाची खरेदी कराल. वारसाहक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तु विषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस उत्तम स्वरूपाचा आहे. 

कर्क: 

आज योग्य व्यक्तीची योग्य कामासाठी निवड करा. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. सौभाग्य योगात वृद्धी होईल. आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. काम पूर्ण होण्याचा योग आहे. यशस्वी व्हाल. नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. 

कन्या: 

आज अनुकूल दिवस आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. नोकरीत व्यापारात आर्थिक वृद्धीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तंत्रज्ञान क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीकारक ग्रहमान आहेत. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून व संततीकडून समाधान सुख लाभेल. पद प्रतिष्ठा लाभेल.

मीन: 

आज दिवस उत्तम राहील. बढतीचे योग आहेत. आत्मविशास वाढेल. मानसन्मान प्रतिष्ठा मिळणार आहे. नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना जोडीदारांकडून साथ लाभेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. आत्मसंतुष्टी मिळेल. पत्नीसौख्य आणी संततीसौख्यही उत्तम असेल. आनंददायी वातावरण राहील. सहकार्य लाभेल. धनलाभ होईल. आर्थिक लाभ होतील.

WhatsApp channel