मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: नोकरीत धाडसी निर्णयाचा दिवस, या ५ नशीबवान राशींना शुक्रवार अपेक्षीत यशाचा

Today lucky zodiac signs: नोकरीत धाडसी निर्णयाचा दिवस, या ५ नशीबवान राशींना शुक्रवार अपेक्षीत यशाचा

Jan 05, 2024 11:27 AM IST

Lucky Rashi Today 5 january 2024: आज नवीन वर्षाचा पहिला शुक्रवारचा दिवस या ५ राशींसाठी सुख-समृद्धी, ऐश्वर्याचा आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 5 january 2024
lucky zodiac signs today 5 january 2024

आज ५ जानेवारी २०२४ शुक्रवार रोजी, शुक्र तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून या दिवशी गजकेसरी योग, सुकर्मा योग, धृतिमान योग, लक्ष्मी नारायण योग आणि चित्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने शुक्रवारचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशींसाठी दिवस लाभदायक आहे, जाणून घ्या या ५ राशी कोणत्या आहेत.

मेष: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद राहील. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. स्फूर्तिदायक घटना घडल्यामुळे कामामध्ये एक प्रकारची गती जाणवेल. तुमचे कर्तृत्व लोकांच्या नजरेत भरेल. आपापल्या क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढेल.

Numerology horoscope: जन्मतारखेनुसार आजचा शुक्रवारचा दिवस कसा जाईल, जाणून घ्या अंकभविष्य

वृषभ: 

आज ग्रहांची साथ चांगली मिळेल. चंद्रबल उत्तम लाभल्याने मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत लाभ होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. मानसिक अवस्था उत्तम राहील. ओळखीने कामे करून घ्याल. स्थावर मालमत्तेसंबंधी महत्त्वाचे निर्णय घ्याल. वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने मात्र तडजोड करावी लागेल. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्नांना यश मिळेल. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील. आरोग्य उत्तम राहील.

कर्क: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात बांधकाम क्षेत्रातील व्यक्तींना फायदेशीर दिवस आहे. हाताखालच्या लोकांचे सहकार्य उत्तम मिळाल्यामुळे कामाची गती वाढेल. शासकीय सेवेतील मंडळीना देखील उत्तम दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होईल. कामकाजाचा विस्तार होईल. प्रेमवीरांनी आपले प्रेम आवडत्या व्यक्तीसमोर व्यक्त करण्यास चांगला दिवस आहे. व्यवसायात तुम्ही केलेल्या नियोजनामुळे आर्थिक घडी चांगली बसेल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. विरोधक आक्रमक होतील त्यांचा वेळीच उत्तर द्याल तर यशस्वी व्हाल.

Mesh Vrishabh Mithun horoscope today : मिथुन राशीच्या लोकांची फसगत होईल! वाचा तिन्ही राशीचे भविष्य

तूळ: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात शेअर मार्केट मध्ये व्यवहार करणाऱ्यांना मोठा फायदा होईल. लांबच्या प्रवासाचे योग येतील. नवीन उमेदीने कामाला लागा. मनइच्छित फळ मिळणार आहे. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. व्यापारात परिस्थिती चांगली राहिल. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. नवीन उपक्रम राबवू शकाल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीं सोबत परिचय होईल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.

वृश्चिकः 

आज शुभयोगामुळे आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. जुनी येणी वसूल होतील. एखादी गोष्ट धडाडीने करण्यात तुमचा पुढाकार राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाण यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. संपादन क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार मिळतील. कर्जाची परतफेड उत्तम प्रकारे करू शकाल. मुलांच्या अडचणी समजून घेण्यात यशस्वी व्हाल. जगावेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहील. मंगळाच्या प्रभावामुळे स्पर्धा परिक्षा विद्यार्थ्यांसाठी शुभयोग आहे. नोकरीत अनुकुलता जाणवेल. शासकीय नोकरदारांसाठी फायदेशीर दिवस आहे.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel