आज सोमवार ५ फेब्रुवारी रोजी चंद्र मंगळाच्या वृश्चिक राशीत आणि मंगळ मकर राशीत प्रवेश करेल. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील दशमी तिथी असून, या दिवशी शनि चंद्र केंद्र योग, ध्रुव योग आणि ज्येष्ठ नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात प्रभाव वाढेल. रोजगारात नवीन कामाची आखणी कराल. कलाकरांना वाव मिळेल. उत्तम यशासाठी जिद्दीने काम कराल. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. महत्वपूर्ण व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. आत्मविश्वास वाढल्याने अवघड समस्याही सहज सोडवाल. आजचे निर्णय महत्वपूर्ण व भविष्याच्या दृष्टीने लाभदायक ठरतील. उत्तम दिवस आहे. व्यापार व्यवसायात तेजी राहील. केलेल्या कार्याची प्रशंसा होईल.
आज फायदेशीर दिवस आहे. हातात पैसा आल्यामुळे बरीच देणीही देऊन टाकाल. रखडलेल्या कामांना गती येईल. नोकरी धंद्यात काही ठोस बदल कराल. पदप्राप्ती होईल. कामाप्रती सजग राहा. आनंदाची व समाधानाची बातमी मिळेल. नव्या संधी मिळतील. घरात मंगल कार्य घडतील. विद्यार्थी प्रगती करतील. आपली कामे नियोजनात्मक पद्धतीने सुरुळीत पार पाडाल. अचानक आर्थिक लाभ होईल. आज केलेली गुंतवणुक फायदेशीर ठरणार आहे. कुटुंबाकडून सहकार्य लाभेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात पैशाची कामे मनासारखी घडतील. संशोधन क्षेत्रात काम करणार्यांची प्रगती होईल. यशप्राप्ती होईल, परिपूर्ण काम कराल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. आपपल्या क्षेत्रात योग्य गुरूवर्य मंडळी भेटतील. पती पत्नीत स्नेह निर्माण होईल. महिला वर्गाकडून विशेष सहकार्य लाभेल. दुरवरचे प्रवास फायदेशीर ठरतील. आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी वेळ मिळेल. आनंद होईल. उत्पन्नाचे नवनवीन मार्ग सापडतील. मानसिक सौख्य लाभेल. आपला छंद जोपासाल. नवनवीन कल्पना सुचतील. अपेक्षेप्रमाणे लाभ होईल.
आज प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मन व्यक्त करायला उत्तम ग्रहमान आहे. नवीन प्रॉपर्टी संबंधी विचार प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. पैशाची आवक चांगली राहील. शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश प्राप्त होईल. अध्यात्मातून आत्मविश्वास मिळवू शकाल. नावलौकिक होईल. वैवाहिक व कौटुंबिक जीवनात आनंदी रहाल. अत्यंत शुभ दिवस असेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आंनदाची बातमी मिळेल. कामानिमित्त प्रवास घडेल. प्रवासातून आज लाभ होणार आहे. कार्यक्षेत्रात वृद्धी होईल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. नोकरीत रोजगारात प्रगतीच्या मार्गाने वाटचाल कराल. विद्यार्थ्यांची विद्याभासात प्रगती होईल. साहित्य कला क्षेत्रातील मंडळीना फारच चांगला दिवस आहे. मान-सन्मान व प्रतिष्ठा मिळेल. कर्तुत्वात वाढ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. फायदेशीर, आनंदी व उत्साही दिवस राहील. मन प्रसन्न राहील.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या