आज ५ ऑगस्ट २०२४ सोमवार रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. अशा प्रकारे, सूर्य चंद्राच्या कर्क राशीत असेल आणि चंद्र सूर्याच्या सिंह राशीत असेल, ज्यामुळे 'राशी परिवर्तन योग' तयार होत आहे. याशिवाय आज श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी राशी परिवर्तन योगासह व्यतिपात योग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ५ राशींना श्रावण महिन्याचा पहिला सोमवार यश व फायदा देणार आहे.
आज नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल.
आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. कोणत्याही प्रश्नाची उकल तुमच्याकडून फार चांगली होत असल्यामुळे अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत.
आज रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. साहित्य क्रिडा या क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिक लाभ चांगला होईल. कलेला दाद मिळेल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. आरोग्य उत्तम राहील.
आज कष्टाचे चीज होईल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. त्यामुळे काही गोष्टी आपसूकच तुमच्या हिताच्या झाल्यामुळे तब्येत खूष होऊन जाईल. रोजगारात संतोषजनक परिणामाची आशा करू शकता. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन बदल घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. उत्तम मोबदला मिळू शकतो. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल.
आज अपेक्षीत यश लाभेल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. बऱ्याच समस्या सुटतील. पैशाची कामे होतील. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल. शासकीय नोकरदारासाठी यशस्वी दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल.