आज बुधवार ४ सप्टेंबर रोजी, सिंह राशीनंतर, चंद्र कन्या राशीत जाणार आहे, ज्यामुळे चंद्र आणि गुरु एकमेकांच्या नवव्या आणि पाचव्या घरात उपस्थित राहतील, ज्यामुळे गुरू चंद्र नवमपंचम योग तयार होईल.
तसेच आज भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी असून, या दिवशी नवमपंचम योगासह साध्य योग, शुभ योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. आज शुभ योग तयार झाल्याने ५ राशींना लाभ होणार आहे.
आज आपल्या इष्ट देवतेची उपासना आणि चिंतन मानसिक स्वास्थ्यासाठी उपयोगी पडेल. धाडस वाखाणण्यासारखे असेल. धंद्यात चांगली प्रगती कराल. घरातील वातावरण प्रसन्न राहील. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. धाडसी निर्णय घ्याल. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील.
आज अनपेक्षीत लाभ होतील. प्रेमळ आणिपरोपकारी वृत्तीमुळे अनेक लोक जोडले जातील. कुटुंबातील व्यक्तींचे उत्तम सहकार्य मिळेल. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात जुनी येणी वसूल होतील. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
आज नोकरी बदलाचे योग आहेत. शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. काम करण्याचा उत्साह वाढेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात आर्थिक लाभ होईल. सकारात्मकेचे परिणाम दिसतील. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. जबाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल. आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील.
आज आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. घेतलेल्या निर्णयाचा फायदा होईल. मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल.
आज प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळणार आहे. वडिलोपार्जित इस्टेटीसंबंधाच्या कामाला गती येईल. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल.