आज शनिवार ४ मे रोजी, कुंभ राशीनंतर चंद्र मीन राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून या तिथीला वरुथिनी एकादशीचे व्रत पाळले जाते. वरुथिनी एकादशीच्या दिवशी गजकेसरी योग, ऐंद्र योग आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार वरुथिनी एकादशीच्या दिवशी या ५ राशीच्या लोकांना शुभ योगाचा लाभ मिळेल.
शशी शनी योग आणि धन योगाचा फायदा काही प्रमाणात मेष राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. मेष राशीतील लोकांची ऑफिसमधील प्रतिमा सुधारेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा होईल. धार्मिक कार्यात व्यग्र राहाल. कोर्टात कायदेशीर बाबी सुरु असतील तर त्यात यश मिळेल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याचा बेत कराल. घरातील वातावरण आनंदी राहील. सर्व लोक तुमच्यावर प्रसन्न राहतील.
आजच्या दुहेरी शुभ योगचा बऱ्यापैकी फायदा वृषभ राशीच्या लोकांनासुद्धा होणार आहे. तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना महत्वाच्या कामात यश मिळून आर्थिक नफा होईल. घरातील वरिष्ठांच्या सल्ल्याने काम कराल तर फलदायी ठरेल. तब्येत थोडी नरम-गरम असेल, मात्र मन प्रसन्न राहील. मुलांकडून मनातील अपेक्षा पूर्ण होतील.
चंद्रभ्रमणाने तयार होणाऱ्या शुभ योगचा सर्वात जास्त फायदा मिथुन राशीला होणार असल्याचे शास्त्र सांगते. आज दिवसभर तुमची साहसी वृत्ती राहील. त्यामुळे आत्मविश्वास वाढून कामात सकारत्मक बदल घडेल. उत्साह वाढल्यामुळे निर्णय क्षमता सुधारेल. व्यवसायात चांगली प्रगती होईल. आई वडिलांसोबत काही वेळेसाठी मतभेद होतील. मात्र संवादातून सर्वकाही ठीक होईल.
या ५ लकी राशींच्या यादीत धनु राशीचा आवर्जून समावेश होतो. आज धनुवरसुद्धा शनिदेवाची कृपा राहणार आहे. त्यामुळे दिवस आनंदी जाईल. तुमच्या क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. भावंडांकडून धनलाभ होण्याची चिन्हे आहेत. व्यवसायात एखादी नवी गोष्ट आजमावण्यासाठी दिवस शुभ आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत संवाद घडून येईल. वातावरण खेळीमेळीचे राहील.
धनु राशीप्रमाणेच कुंभ राशीवरसुद्धा आज शनिदेवाची कृपादृष्टी असणार आहे. आर्थिक घडामोडी घडून येतील. व्यवसायात नवनवीन गोष्टी घडून आर्थिक नफा होईल. अनेक दिवसांपासुन अडकून असलेला पैसा परत मिळेल. रखडलेली कामे अचानक पूर्णत्वास जातील. त्यामुळे घरात आनंदी वातावरण राहील. तुमच्या समजूतदार, शांत स्वभावाचा ऑफिस कामात फायदा होईल.