Lucky Rashi Bhavishya 4 June 2024 : वैदिक जोतिषशास्त्रात एकूण १२ राशींचा उल्लेख करण्यात आला आहे. या राशीनुसार प्रत्येक व्यक्तीचे भविष्य ठरत असते. प्रत्येक व्यक्तीच्या जन्माची तारीख, वेळ, आणि ग्रह यानुसार त्या-त्या व्यक्तींची रास निश्चित केली जाते. ग्रह-नक्षत्रांच्या स्थान बदलावरुन या राशींचे अंदाज बांधण्यात येतात. या अंदाजावरुन काही राशींसाठी सकारात्मक तर काही राशींसाठी नकारात्मक परिणाम दिसून येतात. आज मंगळवारच्या दिवशी बुधादित्य योग, धनयोग आणि कलायोग निर्माण होत आहे. या शुभयोगात आज ५ राशी नशिबवान ठरणार आहेत. पाहूया या राशी नेमक्या कोणत्या आहेत.
आज गरज करणात आणि बुधादित्य योगात वृषभ राशीसाठी दिवस लाभदायक असणार आहे. व्यापारातून धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. महत्वाच्या कार्यात मित्रमंडळी आणि भावंडांची मदत मिळेल. मिळकतीचे नवे मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. क्रीडा क्षेत्रातील लोकांना चांगल्या संधी प्राप्त होतील. खाद्य पदार्थांचा व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ संभवतो. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मानसन्मान मिळेल. एकंदरीत आजचा दिवस समाधानकारक असणार आहे.
आज मंगळवारचा दिवस कर्क राशीच्या लोकांसाठी उत्तम असणार आहे. शोभन योगाचा विशेष लाभ या राशीच्या लोकांना मिळणार आहे. आज दिवस शुभ असल्याने कार्यक्षेत्रात विरोधकांवर मात करण्यात वरचढ ठराल. कामातील तुमची जिद्द आणि चोखपणा पाहून वरिष्ठ प्रभावित होतील. घरामध्ये महागड्या वस्तूंची खरेदी कराल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदी असणार आहे. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी जुळून येतील. अनेक दिवसांपासून वाहन खरेदीच्या विचारात असाल तर ती इच्छा पूर्ण होण्याकडे पाऊले टाकाल.
आज धनयोगात तूळ राशीच्या लोकांसाठी दिवस उत्तम असणार आहे. आयुष्यात प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यशाची चव चाखता येईल. हातात घेतलेली महत्वाची कामे उत्तमरीत्या पार पडतील. विविध मार्गाने धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे. मन प्रसन्न होऊन ताण दूर होईल. नातेवाईकांना भेटण्याचा योग जुळून येईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. जोडीदार खुश झाल्याने आजचा दिवस रोमँटिक असणार आहे.
आज शुभ चंद्रभ्रमणात वृश्चिक राशीसाठी दिवस शुभ असणार आहे. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आज दुप्पट लाभ होणार आहे. अचानक धनलाभ झाल्याने आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून सुरु असलेली पैशांची चणचण आज संपेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत असलेले वाद आज संपुष्ठात येतील. त्यामुळे मनावरचा ताण कमी होईल. सामाजिक कार्य करणाऱ्यांना मानसन्मान प्राप्त होईल.
मीन राशीसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल. वरिष्ठांकडून नव्या जबाबदाऱ्या मिळतील. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे मार्गी लागतील. यातून मनःशांती लाभेल. प्रॉपर्टीसंबंधी वादविवाद मिटून तुमच्या पक्षात निर्णय लागेल. व्यवसायिकांना व्यवसायात चांगला नफा होऊन आर्थिक स्थिती मजबूत होईल. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. त्यातून तुमचे नातेसंबंध सुधारुन प्रेम वाढीस लागेल.
संबंधित बातम्या