आज ४ जुलै २०२४ गुरुवार रोजी, चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथी असल्याने या दिवशी वृद्धी योग, गजकेसरी योग आणि मृगाशिरा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांना लकी ठरेल.
आज कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. आर्थिक फायदा होईल. व्यापारात नवीन प्रस्ताव मिळतील. प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. शुभ कार्यात सामील व्हाल. लाभ अधिक होईल. दुरवरच्या प्रवासातुन लाभ मिळवाल. यश मिळेल.
आज काही करण्याची खूप स्वप्ने रंगवली असतील. उद्योग प्रियतेमुळे यशाला खेचून आणाल. आपल्या कार्यक्षेत्रात अगोदर केलेल्या कामाचा आज आपल्याला निश्चितच लाभ होणार असून, आर्थिक आवक वाढणार आहे. ध्येयापासून विचलित होऊ नका. तुमच्यातल्या सुप्त गुणांचा फायदा होईल. कालावधीत वेगाने मार्गी लागतील. प्रवासही होणार आहेत. कार्यक्षेत्रात उद्दिष्ट पूर्ण होतील. भावंडाकडून आर्थिक सहकार्य मिळू शकते.
आज जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. कौशल्याचा उपयोग केल्यास फायदा होईल. मनाप्रमाणे वागवून घ्याल. आर्थिक नियोजन करण्यात तुमचा हात कोणी धरणार नाही. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. यश निश्चित लाभेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. आकस्मिक धनलाभ होईल.
आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. व्यवसायातील वातावरण चांगले राहील.
आज शुभ योग आहे. कार्यक्षेत्रात वरचढ ठरणार आहात. महत्वपूर्ण कागदपत्रे मात्र संभाळा. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिनमान उत्तम राहील. कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.
संबंधित बातम्या