Today lucky zodiac signs: व्यापार-धंद्यात तेजी, आर्थिकवृद्धीचा गुरुवार! या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: व्यापार-धंद्यात तेजी, आर्थिकवृद्धीचा गुरुवार! या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

Today lucky zodiac signs: व्यापार-धंद्यात तेजी, आर्थिकवृद्धीचा गुरुवार! या ५ राशींसाठी भाग्योदयाचा दिवस

Jan 04, 2024 10:48 AM IST

Lucky Rashi Today 4 january 2024: आज नवीन वर्षाचा पहिला गुरुवारचा दिवस या ५ राशींसाठी लक्ष्मी कृपेचा. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 4 january 2024
lucky zodiac signs today 4 january 2024

आज ४ जानेवारी २०२४ गुरुवार रोजी, गुरु आणि सूर्य हे एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात राहणार आहेत, यामुळे गुरु सूर्याचा नवमपंचम योग तयार झाला आहे आणि चंद्रही कन्या राशीनंतर तूळ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी सुकर्म योग, लक्ष्मी नारायण योग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात ५ राशीसाठी आजचा दिवस महालक्ष्मीच्या कृपेने लाभदायक ठरेल. जाणून घ्या या ५ राशी कोणत्या आहेत.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राचा शुभ योग संयोगामुळे कुटुंबातील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाईट परिस्थितीवर मात कराल.  उद्योग व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत मोठे पद मिळेल. नवीन वाहन खरेदीचे योग आहे. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. जोडीदाराच्या मदतीने महत्त्वाचे निर्णय घेणे शक्य होईल. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नवीन योजनेस प्रारंभ करण्यास उत्तम दिवस आहे. विद्यार्थ्यांना साहित्य वाचनाची आवड निर्माण होईल. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. कुटुंबातील सदस्य आजारी असतील तर प्रकृतीत सुधारणा होईल. मनावरचा ताण बर्‍यापैकी कमी झालेला असेल.

कर्क: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग संयोगामुळे फायदेशीर दिवस जाईल. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. धाडस आणि कामाचा उरक चांगला राहील. परदेशाशी व्यवहार करणाऱ्यांना फायदेशीर दिवस ठरेल. करिअरमध्ये एखादी गोष्ट करण्याचा निर्धार आणि निश्चयीपणा यशस्वी होईल. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडेल. त्यातून आर्थिक लाभ होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. उद्योग व्यवसायातील मंडळीना नवीन प्रकल्प हाती येतील. नवीन स्थावर मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहे. कुटुंबात शुभवार्ता मिळेल. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील.

धनु: 

आज ग्रह-नक्षत्र उत्तम असल्याने लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. वैवाहिक जीवनात घरातील वातावरण आनंदी राहील. नोकरी व्यवसायात तुमच्या वेगवेगळ्या कल्पनांचे स्वागत होईल. वरिष्ठांची मर्जी राहील. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कार्यप्रणाली व कल्पना शक्ती यात सुधारणा होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार व उद्योग तेजीत राहतील. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल.

मकर: 

आज लाभदायक घटना घडणार आहेत. सरकारी नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन मिळण्याचे योग आहेत. कोणत्याही बौद्धिक कसरती करण्यापेक्षा व्यवहारिक निर्णय घेण्यावर जास्त भर द्याल. उधारी वसूल होईल. व्यवसायात आवश्यक ते बदल करण्याच्या संधी मिळतील. कौटुंबिक पातळीवर पत्नीकडून व संततीकडून उत्तम सुख मिळेल. लेखन कार्य व ग्रंथप्रकाशानात लाभ होईल. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. मित्रमैत्रिणींकडून लाभ होईल. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. व्यापारात उत्तम धनप्राप्ती होईल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळीचा गौरव वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ घडेल. आपल्या तर्कबुद्धीने शत्रुवर विजय मिळवाल. नवे काही करण्याचा प्रयत्न कराल, त्यात यश मिळेल.

मीनः 

आज ग्रह-नक्षत्रांचा शुभ संयोग आर्थिक बाबतीत प्रगती मिळवून देईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय नोकरी या संदर्भातील कामे लवकर घडून येतील. घरातील लोकांचे उत्तम सहकार्य लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. बेरोजगारांना नवीन नोकरी लागण्याची संधी उपलब्ध होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. आपल्याला जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार होईल. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. संततीची बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Whats_app_banner