मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : या ५ राशींच्या लोकांसाठी भरभराटीचा रविवार, नशीबाला कलाटणी मिळेल

Today lucky zodiac signs : या ५ राशींच्या लोकांसाठी भरभराटीचा रविवार, नशीबाला कलाटणी मिळेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Feb 04, 2024 01:07 PM IST

Lucky Rashi Today 4 february 2024: आज ४ फेब्रुवारी २०२४ रविवार रोजी, ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात या ५ राशींना नशीबाची खास साथ लाभेल, जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 4 february 2024
lucky zodiac signs today 4 february 2024

आज रविवार ४ फेब्रुवारी रोजी चंद्राचे वृश्चिक राशीत भ्रमण होणार असून, सूर्य आणि चंद्र द्वितीय, तृतीय आणि अकराव्या भावात राहणार असल्याने त्रिएकादश योग तयार होत आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून, या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींसाठी आज शुभ योग तयार होत असल्याने त्याचा लाभ होणार आहे. जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

सिंह: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात लाभ होईल. आर्थिक घडी बसेल. कलाकरांना संधी मिळतील. यशाची जबरदस्त आसक्ती तुम्हाला नेहमीच असते. त्यामुळे जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये समारंभाचे नियोजन आपण उत्कृष्ट आखाल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल.

कन्या: 

आज प्रेम प्रकरणात आवडत्या व्यक्तीजवळ आपले मनोगत व्यक्त करायला उत्तम ग्रहयोग आहे. नवीन मालमत्तेसंबंधी विचार चालले असतील तर प्रत्यक्षात उतरवायला हरकत नाही. प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामची आवड राहील. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. 

वृश्चिक: 

आज समाजात मान मिळेल. नवे मार्ग सापडतील. लांबचे प्रवास आनंददायक होतील. समाजासाठी आपण करत असलेल्या कामासाठी आपल्याला बहुमाना बरोबरच प्रसिद्धीही मिळेल. योग्य व्यक्तीचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल. कुंटुबातील वातावरण एकंदरीत आनंददायक राहील. कुंटुंबात सलोख्याचे वातावरण निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल.  मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल.

धनु: 

आज कुटुंबात आनंदी वातावरण राहील. मित्रमंडळींच्या गाठीभेटी होतील. इतरांना खूप सहकार्य कराल. नावलौकिक वाढेल. लेखकांच्या लिखाणास गती मिळेल. व्यवसायात उत्तम नियोजनामुळे एक प्रकारची शिस्त असेल. मनाप्रमाणे खरेदी कराल. सहकार्य लाभेल. सामाजिक कार्याची आवड राहील. विद्यार्थ्यांची प्रगती पाहून समाधान होईल. बेरोजगारांना नोकरी मिळेल. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. 

मीन: 

आज ग्रह-नक्षत्रांची उत्तम साथ राहील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. कुटुंबाक सुख-समाधानाचे उत्तम वातावरण राहील. 

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)