आज ४ ऑगस्ट २०२४ रविवार रोजी, चंद्र कर्क राशीत भ्रमण करत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, ही तिथी दीप अमावस्या म्हणून ओळखली जाते. दीप अमावस्येच्या दिवशी रविपुष्य योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. यशाचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग येतील. खेळाडूंना अपेक्षित यश संपादन करता येईल.
आज व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभाबरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. कर्जप्रकरणात दिलासा मिळेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल.
आज सकारात्मक विचारामुळे उत्साह वाढेल. वैवाहिक जीवनात तर याचे महत्त्व फारच राहील. फायदेशीर व्यवहार करता येतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. तुमच्या कामाचा लाभ तुम्हाला निश्चित मिळणार आहे. एखाद्या जुन्या मित्राची भेट होईल. उद्दिष्ट साकार करण्यासाठी अनुकूलता लाभेल. अपेक्षित यश संपादन करता येईल. व्यावसायिकांमध्ये आर्थिक आवक वाढेल. संततीकडून सर्व दृष्ट्या आनंददायक बातम्या मिळतील.
आज आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे राहतील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. नवीन घर किंवा वाहन घेण्याचा योग आहे. स्वभाव मन मिळावु राहील. आर्थिकदृष्या लाभ होईल.
आज तुमची मते बेधडकपणे मांडाल आणि वाहवा मिळवाल. घरात एखादी चांगली खरेदी कराल. त्यामुळे सर्व खूष राहतील. व्यवसायात आर्थिक तेजी आणि नेमकेपणा राहील. सांपत्तिक परिस्थितीत सुधारणा होईल. आचरण उत्तम राहिल्यामुळे नावलौकिकता वाढेल. वारसाहकाने धन व संपत्ती लाभणार आहे. व्यवसायानिमित्त प्रवासाचे योग येतील. जमीन खरेदी विक्रीतून उत्तम आर्थिक फायदा होईल. धार्मिक कार्य करण्याची इच्छा निर्माण होईल.