जोतिष शास्त्रानुसार आज शुक्रवार ३१ मे २०२४ चा दिवस अतिशय महत्वाचा आहे. आज ज्येष्ठ महिन्यातील आठवी आणि नववी तिथी असणार आहे. सकाळी ९.३८ मिनिटापर्यंत आठवी आणि नंतर नववी तिथी सुरु होईल. तसेच सकाळी ६ वाजून १४ मिनिटांपर्यंत शततारका नक्षत्र आणि त्यांनंतर पूर्वा भाद्रपद नक्षत्र असणार आहे. यामध्ये अनेक शुभ-अशुभ योग घटित होत आहेत. त्यांचा परिणाम राशीचक्रातील राशींवरसुद्धा होत आहे. यातील शुभ परिणाम होणाऱ्या आजच्या नशीबवान राशी कोणत्या हे जाणून घेऊया.
आजचा मे महिन्याचा शेवटचा दिवस आहे. हा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी अतिशय उत्तम असणार आहे. आज तुम्ही मुलांच्या करिअरबाबत ठोस निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. मुलांकडून महत्वाच्या निर्णयात उत्तम सहकार्य मिळेल. त्यामुळे घरातील वातावरण आनंदित असणार आहे. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जाण्याची योजना आखाल. आज अनेक दिवसांनंतर जुन्या मित्रांची भेट होऊ शकते. त्यांच्यासोबत जुन्या आठवणींत रमाल. अनेक दिवसांपासून डोक्यात असलेले एखादे नवे काम सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. मानसिक स्थिती उत्तम राहील. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा अधिक वाढेल.
आज तैतिल करणात मिथुन राशीच्या लोकांसाठी दिवस लाभकारक असणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये तुमची वेगाने प्रगती होईल. अचानक एखादा मित्र घरी भेट देऊ शकतो. मित्राच्या येण्याने मन उत्साही राहील. भूतकाळातील गप्पागोष्टी रंगतील. आज एखाद्याची मदत करुन तुम्हाला आत्मिक समाधान लाभेल. आईवडिलांच्या सेवेत आजचा दिवस व्यग्र राहील. त्यामुळे पालकांसोबत नातेसंबंध सुधारुन प्रेम वाढीस लागेल. अडचणीच्या वेळी मित्रांची मदत निश्चित मिळेल. गुंतवणूक करताना मात्र काळजीपूर्वक आणि तज्ञांच्या सल्ल्याने करावी.
आज शुक्रवारचा दिवस कर्क राशीसाठी चांगला असणार आहे. आज तैतिल करणात कर्क राशीच्या लोकांना शुभ लाभ देणाऱ्या घटना घडतील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कठोर परिश्रमांची स्तुती केली जाईल. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. समाजातील प्रतिष्ठित लोकांशी गाठीभेटी होतील. अशा लोकांच्या संपर्कात आल्याने तुमचाही मानसन्मान वाढेल. नोकरी करणाऱ्यांना प्रमोशनचा योग जुळून येत आहे. कला क्षेत्रातील लोकांना चांगले व्यासपीठ उपलब्ध होईल.
वृश्चिक आज समाधानकारक दिवस असणार आहे. अनेक दिवसांपासून वाहन खरेदीच्या विचारात असाल तर आज हे स्वप्न होईल. उद्योग-व्यापारात चांगला आर्थिक नफा मिळेल. एखादी नवी गोष्ट सुरु करण्यासाठी आजचा दिवस अतिशय शुभ आहे. महत्वाच्या प्रकरणात विचारांती योग्य निर्णय घ्याल. विवाहित लोकांना जोडीदारांचा सहवास लाभेल. मनमोकळा संवाद होऊन नाते आणखी दृढ होईल. शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना आपले कलागुण दाखवण्याची संधी उपलब्ध होईल.
धनु राशीसाठी आज शुक्रवारचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुम्हाला कार्यक्षेत्रात मनासारखे यश मिळेल. वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. सहकाऱ्यांकडून तुमच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक होईल. मानसिक आजार संपुष्ठात येऊन स्वास्थ्य सुधारेल. जुन्या मित्रांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्यासोबत वेळ चांगला जाईल. आज एखाद्या आळशी व्यक्तीकडून काम करुन घेण्यात यशस्वी व्हाल. मात्र आज तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा.
संबंधित बातम्या