Lucky Zodiac Signs : एकादशी ठरेल भरभराटीची, पैशाची कामे होतील! या ५ राशींसाठी लकी ठरेल बुधवार
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : एकादशी ठरेल भरभराटीची, पैशाची कामे होतील! या ५ राशींसाठी लकी ठरेल बुधवार

Lucky Zodiac Signs : एकादशी ठरेल भरभराटीची, पैशाची कामे होतील! या ५ राशींसाठी लकी ठरेल बुधवार

Jul 31, 2024 04:30 AM IST

Lucky Rashi Bhavishya 31 July 2024 : आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून, एकादशी व्रताच्या दिवशी गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे. महिन्याच शेवटचा दिवस या ५ राशींसाठी फायदेशीर.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३१ जुलै २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३१ जुलै २०२४

आज ३१ जुलै २०२४ बुधवार रोजी, चंद्र वृषभ राशीनंतर मिथुन राशीत जाणार आहे. वृषभ राशीत चंद्र आणि गुरूच्या संयोगामुळे गजकेसरी योग तयार होत आहे. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला कामिका एकादशी व्रत म्हणतात. एकादशी व्रताच्या दिवशी गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग, ध्रुव योग आणि रोहिणी नक्षत्र यांचा शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.

मेषः 

आज कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत. बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे. आईच्या प्रकृतिकडे लक्ष द्यावे. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. मान सन्मान मिळेल.

मिथुन: 

आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. उत्तम दिनमान आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराटी होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. 

कर्कः 

आज प्रेम प्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडेल किंवा नवीन संधी चालून येतील. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. आर्थिक लाभ चांगला होईल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

सिंहः 

आज भाग्योदयकारक दिवस आहे. अडलेली कामे मार्गी लागतील. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. उत्तम दिवस आहे. 

तूळ: 

आज विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. पैशाची कामे होतील. शासकीय नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. गृहसौख्य पत्नीची साथ मिळेल. व्यापारात लाभ होईल. आपणास अनुकूल वातावरण निर्माण होईल.

Whats_app_banner