आज बुधवार ३१ जानेवारी रोजी, कन्या राशीत चंद्राचे भ्रमण होणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षाची पंचमी तिथी असून, या दिवशी त्रिग्रही योग, सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग आणि हस्त नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आजच्या शुभ योगाचा फायदा होणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात प्रगती होईल. तुमचे यश पक्के आणि स्थायी स्वरूपाचे असेल. कामाच्या ठिकाणी उत्साही आणि आनंदी वातावरण लाभेल. कामाचा विस्तार होईल. नवीन जागा घेण्याच्या विचारात असाल तर त्यात यश मिळेल. सामाजिक कार्यकर्त्या महिलांसाठी काळ अनुकूल आहे. खेळाडूंसाठी शुभ घटनांचा काळ आहे. आत्मविश्वास वाढीचा दिवस आहे. आर्थिक वृद्धी होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात आर्थिक घडी बसेल. कलाकारांना संधी मिळतील. जिद्दीने कामाला लागाल. कलावंतांना उत्तम प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये उत्कृष्ट समारंभाचे नियोजन कराल. व्यवसायिकांना काळ अनुकूल आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. जमिनीसंबधीत रखडलेली कामे मार्गी लागतील. पतीपत्नीतील संबंध दृढ होतील. दिवस आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील.
आज उत्तम ग्रहयोग आहे. संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांची प्रगती होईल. व्यापारी लोकांशी मैत्री राहील. भांवडे मदत करतील. वित्तीय संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. कार्यक्षेत्रात हितशत्रु आणि स्पर्धकांवर मात कराल. व्यवसायात जम बसेल. सार्वजनिक कामाची आवड राहील. राहीलेली कामे पूर्ण होतील. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल. आपल्या कार्याचा विस्तार वाढेल.
आज ग्रहयोग उत्तम साथ देतील. बरीच कामे मार्गी लागतील. पूर्वीपेक्षा पैशाची आवक चांगली राहील. आज गुंतवणूक करा. निश्चितच भविष्यात ही गुंतवणुक फायदेशीर ठरेल. प्रोत्साहन मिळेल. मित्र मैत्रिणी व जोडीदारांकडून सहकार्य लाभेल. व्यापारात आपली प्रतिमा उंचावेल. गृहसौख्य उत्तम आहे. प्रेम प्रकरणात संबंध दृढ होतील. व्यावसायिकांना अपेक्षित यश लाभेल. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. प्रेमप्रकरणामध्ये यश येईल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगात स्वतःच्या आणि इतरांच्या वेळेचे महत्त्व जपाल. व्यापारात व्यवसायवृद्धीसाठी प्रवासाचे योग येतील. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. सर्वच क्षेत्रातील जातकांना धनलाभाचा दिवस आहे. व्यापारात नवीन योजनेचा प्रारंभ करा वक्तृत्वाचा प्रभाव राहील. समाजात आपला मान-सन्मान प्रतिष्ठा वाढेल. वडिलोपार्जित अथवा वडिलांबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या