मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: वर्ष अखेरचा दिवस आज या ५ राशींसाठी खास फायद्याचा

Today lucky zodiac signs: वर्ष अखेरचा दिवस आज या ५ राशींसाठी खास फायद्याचा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Dec 31, 2023 01:32 PM IST

Lucky rashi today 31 December 2023: आज ग्रह-नक्षत्राचा योग संयोग आणि वर्ष २०२३ चा शेवटचा दिवस ५ राशींना भाग्याची साथ देणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या ते जाणून घ्या.

lucky zodiac signs today 31 december
lucky zodiac signs today 31 december

चंद्रही सूर्याच्या राशीत सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी आयुष्मान योगासोबत प्रीति योग, लक्ष्मी नारायण योग आणि मघा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार वर्षाच्या शेवटच्या दिवशी शुभ योग तयार झाल्याने पाच राशींना फायदा होणार आहे. या राशीचे लोक आज नवीन वर्षाबद्दल उत्साही राहतील आणि नशिबात चांगली वाढ होईल.

मेषः 

आज चंद्राचा तिन ग्रहांशी योग होत असुन चंद्रावर शनिची पुर्ण दृष्टी आहे. बुद्धीला विशिष्ट झेप देणारे ग्रहमान असल्यामुळे त्याचा फायदा होईल. मित्र मैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. आनंदी आणि उत्साही वातावरण लाभेल. तुमच्या आनंदात वरिष्ठही सहभागी झाल्यामुळे तुमचा आनंद अधिकच दुणावेल. जगा वेगळ्या गोष्टी करण्याकडे कल राहिल. मानसिक आणि शारिरिक आरोग्य उत्तम राहिल. घरातील वरिष्ठ मंडळी विशेषत आईच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खेळाडूंसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लागणार आहे. हातात घेतलेल्या कामात यश मिळेल. मोठ्या घराण्याचा स्नेह प्राप्त होईल. सामाजिक कार्यात आपला लौकीक सांभळण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या बोलण्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

मिथुनः 

आज राशीस्वामी बुध लाभदायक आणि चंद्र भ्रमण शुभ स्थानातुन होत आहे. घरात नवीन वस्तूंची खरेदी कराल. मुलांच्या करियर संबंधी आर्थिक तरतूद करण्याकडे कल राहील. कुटुंबात तुमच्या नवीन विचारांचे स्वागत होईल. नवीन धोरणं योजना राबवून स्पर्धकांवर मात करावी लागेल. इतरांना आर्थिक मदत करताना विशेष काळजी घ्या. नात्यात मैत्रीत मधुरता येईल. लेखक कलाकारांना नवनिर्मितीच्या संधी उपलब्ध होतील. कर्जाच्या समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतील. मनातील योजना पार पाडता येणार आहेत.

कर्कः 

आज चंद्राशी होणारा इतर ग्रहांचा योग पाहता ग्रहांची अनुकूलता आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रातील ज्ञानाचा तुम्हाला खूप उपयोग होईल. तुमच्या नवीन कल्पनांचे स्वागत होईल. कोणत्याही प्रकारची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. सफलतेचा आनंद मिळणार आहे. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय वृद्धीच्या संधी चालून येतील. शेअर्स अथवा अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. नवीन गृहोपयोगी वस्तु खरेदीचे योग आहेत.

कन्याः 

आज चंद्राचं बलं चांगलं लाभल्याने प्रत्येक वेळी स्वत:च्या पद्धतीनेच काम करण्याच आग्रह न ठेवता दुसऱ्यांचा विचार करणे आवश्यक ठरेल. वैवाहिक सौख्य चांगले मिळेल. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. बुद्धी आणि शारीरिक ताकद यांचे प्रमाण बिघडल्यामुळे कामाचा वेग कमी होईल. आपल्या कार्यक्षेत्रात आर्थिक लाभा बरोबर प्रतिष्ठाही मिळेल. जमिन विक्रीतून लाभ होईल. घरात एखादे धार्मिक कार्य कराल. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना फायदेशीर काळ आहे. व्यवसायवृद्धी साठी प्रवासाचे योग येतील. व्यवसायात विचारपूर्वक गुंतवणूक करा. खरेदी करताना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. स्थावर अथवा दीर्घ मुदतीची गुंतवणूक पुढील काळासाठी फायदेशीर ठरणार आहे. जुनी येणी अचानक वसूल होतील. कर्जप्रकरणात दिलासा मिळेल.

धनुः 

आज गुरूबल शुभ राहिल्याने व्यवसायाला योग्य दिशा मिळेल. जोडीदाराशी संबंध सलोख्याचे रहातील. जोडीदाराकडून बऱ्याच अपेक्षा पूर्ण होतील. मनात नसताना प्रवासाला जावे लागेत. तब्येत चांगली ठेवा. हजरजबाबी स्वभावामुळे लोकांवर प्रभाव पाडाल. शेअर मार्केटध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कामाचा वेग नक्कीच वाढेल. जुन्या मित्र मैत्रिणी आपणास पुन्हा भेटणार आहे. आपल्याला नवीन वाहन घेण्याचा योग आहे. आपण याचा नक्कीच लाभ उठवाल. आध्यात्मिक विषयाची आवड निर्माण होईल. स्वभाव मन मिळावु राहील. नवीन वाहन घर खरेदीचे योग आहेत. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. कला क्षेत्रातील व्यक्तींना आर्थिकदृष्या लाभ होईल. आपला स्वभाव दृढनिश्चयी व उद्योगशील राहील. आकस्मिक धनलाभ प्राप्तीचे योग आहेत.