आज शनिवार ३१ ऑगस्ट रोजी, चंद्र स्वतःच्या कर्क राशीत आहे तर शनिदेव स्वतःच्या कुंभ राशीत विराजमान आहे, त्यामुळे शश राजयोग तयार होत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथी असून, या तिथीला शनि प्रदोष तिथीचे व्रत केले जाणार आहे. शनि प्रदोष व्रताच्या दिवशी शश योग, वरियान योग आणि पुष्य नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.
आज दिवस चांगला ठरू शकतो. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. विरोधकही शांत होतील. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. बढती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. परदेशगमनाचे योग आहेत. प्रेमप्रकरणात यश येईल. आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल.
आज पती पत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहिल. आरोग्य उत्तम राहील. नेतृत्वगुण विकसित होईल. गुप्तपणे काम करत राहावे आणि यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. कौटुंबिक जीवन खूप चांगले ठेवाल. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. बढती व वेतनवाढीचा योग आहे. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश मिळेल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. कुंटुंबात सलोख्याचं वातावरण निर्माण होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील. व्यापार उद्योगात फायदा होईल. मान सन्मानात वाढ होईल.
आज व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. एकंदरित शुभ फलदायी दिवस राहील. आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत निर्माण करण्याच्या विचारात असाल. यश मिळवू शकता. नवीन कार किंवा घर खरेदी करू शकतात. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल. मानसन्मान मिळेल. आर्थिक लाभ होतील.
आज भरपूर आर्थिक लाभ होईल. घरामध्ये चांगले वातावरण असेल आणि कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. नोकरीमध्ये सन्मान आणि लाभ मिळेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. कामातून मिळणाऱ्या लाभात मन समाधानी राहील. धन लाभाचा दिवस आहे. मानसन्मान प्रतिष्ठा वाढेल. व्यापारात आकस्मिक लाभाचा योग आहे.