आज सोमवार ३० सप्टेंबर रोजी, चंद्र रात्रंदिवस सिंह राशीत भ्रमण करणार असून गुरु चंद्रापासून दहाव्या भावात असल्यामुळे अमला योग तयार होत आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी असून या दिवशी सोम प्रदोष व्रत आणि त्रयोदशी तिथीचे श्राद्धही केले जाईल. सोम प्रदोष व्रताच्या दिवशी अमला योग, शुक्ल योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल.
आज राहीलेली कामे पूर्ण होतील. अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. प्रसिद्धीचे योग येतील. महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदय कारक दिवस आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभणार आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल.
आज बौद्धीक कसरतीपेक्षा युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वाढ होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलो पार्जित इस्टेटीतून लाभ होईल. वाहन घर खरेदीचा योग आहे. व्यापार उद्योगात प्रगती राहील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल.
आज कामे पूर्णत्वास जातील. तुम्हाला फायदा होणार आहे. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. मात्र अतिउत्साह व अतिरेकपणा टाळावा. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत कायदा होण्याचे योग आहेत. आज भरभराटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील.
आज यशस्वी व्हाल. योग्य संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. प्रतिष्ठा वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल.
आज कलाकारांची कला बहरेल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. कामातील बदल हा सुद्धा तुम्हाला काम करण्यासाठी उत्साहदायी ठरेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. व्यवसायातून जुनी येणी वसूल विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. बोलण्यातील संभ्रम मात्र दुर ठेवा. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील. स्वतःच्या मनाने विचारा अंतीच निर्णय घ्या. आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. मन प्रसन्न राहील.