Lucky Rashi Bhavishya 28 October 2024 :आज नरक चतुर्दशी. आजच्या तिथीला छोटी दिवाळी असेही संबोधतात बुधवार आणि कार्तिक कृष्ण त्रयोदशी आहे. त्रयोदशी तिथी आज बुधवारी दुपारी १ वाजून १६ मिनिटांपर्यंत असेल. त्यानंतर चतुर्दशी तिथी सुरू होईल. आज सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत वैधृति योग असेल. आज रात्री ९ वाजून ४४ मिनिटांपर्यंत हस्त नक्षत्र असेल. ३० ऑक्टोबर, बुधवारी रूप चतुर्दशी तिथी मेष, मिथुन, सिंह, तूळ आणि कुंभ या राशींच्या जातकांसाठी अतिशय शुभ असणार आहे. या लकी राशींच्या जातकांना नोकरी, व्यवसाय, आरोग्य आणि कौटुंबिक सौख्य लाभेल. पाहुया, या राशींचे सविस्तर राशिफळ.
मेष राशीचे जातक आज आनंदी राहतील. आज नवे वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्यासाठी चांगला दिवस आहे. नोकरी किंवा व्यवसायात लाभ मिळेल. तुम्हाला हवे तसे भोजन मिळाल्याने तुम्ही खूश व्हाल. कुटुंबीयांसह फिरायला जाण्याचा आनंद मिळेल. आरोग्य पूर्वीच्या तुलनेत चांगले राहील.
मिथुन राशीच्या जातकांना मनासारखी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणाशी संबंधित लोकांना आज लाभ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस शुभ असेल. जुने आजार बरे होतील. दीर्घकाळापासून अडलेली कामे आज पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना परिश्रमाचा लाभ मिळेल.
सिंह राशीच्या जातकांना आज नशीबाची साथ लाभेल. बँकेतील जमा रकमेत वाढ होईल. मित्रांसमवेत फिरायला जाण्याची शक्यता आहे. कुटुंबीयांसह शॉपिंगचा आनंद घ्याल. मुलांशी संबंधित एखादी चांगली बातमी कानी येईल. गुंतवणुकीच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला आहे.
तूळ राशीच्या लोकांची अडकलेली कामे आज पूर्ण होतील. प्रेमसंबंधात सफलता मिळेल. नवे काम सुरू करण्याच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय शुभ आहे. वडिलोपार्जित संपतीद्वारे फायदा होईल. मुलांकडून सुख मिळेल आणि त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. अनुभवी लोकांचे सहकार्य मिळेल. धनलाभाचा देखील योग आहे.
कुंभ राशीच्या जातकांना मनाप्रमाणे सुख मिळेल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा मिळेल. मुलांशी संबंधित एखाद्या गोष्टीचे टेशन दूर होऊ शकते. पती-पत्नींमध्ये सुरू असलेला वाद मिटेल. आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतील. तुम्ही तुमचे कर्ज फेडण्यात यशस्वी व्हा आणि सुखाची झोप घ्याल.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
संबंधित बातम्या