जोतिष शास्त्रानुसार आज ग्रह-नक्षत्रांमध्ये प्रचंड हालचाली दिसून येत आहे. शास्त्रानुसार आजच्या ग्रहांची स्थिती पाहता सूर्य, गुरु आणि शुक्र वृषभ राशीत विराजमान आहेत. तर दुसरीकडे चंद्र आणि गुरु कुंभ राशीत संक्रमण करत आहेत. त्यांच्यामध्ये विषयोगाची निर्मिती होत आहे. तसेच मंगळ आणि केतू अद्याप अंगारक योगाची निर्मिती करत मीन राशीच्या दिशेने संक्रमण करत आहेत. या सर्व हालचालींमध्ये काही शुभ तर काही अशुभ योग निर्माण होत आहेत. यामध्ये आजचा दिवस कोणत्या ५ राशींसाठी लकी ठरणार ते जाणून घेऊया.
मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहपूर्वक असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभणार आहे. त्यामुळे तुमची महत्वाची कामे वेगाने पार पडतील. आज कमाईचे नवे मार्ग खुले होतील. त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. व्यावसायिक योजनांना चालना मिळेल. धार्मिक कार्यांमध्ये रुची वाढेल. तुमच्याकडून अध्यात्मिक गोष्टी घडतील. घरामध्ये अचानक नातेवाईक भेट देतील. त्यांच्या आगमनाने मन आनंदी होईल. जोडीदाराला खुश करण्यासाठी भेटवस्तू घेण्याचा विचार मनात येईल. मात्र आईवडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. चंद्र आणि शनीच्या संयोगाने आज शनी शश योगाची निर्मिती होत आहे. या योगात तुम्हाला तुमच्या कष्टाचे उत्तम फळ मिळणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेली कामे अचानक पूर्णत्वास जातील. करिअरमध्ये अचानक मोठी झेप घ्याल. तुमच्यामध्ये असलेले सुप्त कलागुण लोकांच्या समोर येतील. तुमच्या कलागुणांचे कौतुक होऊन लोक आकर्षित होतील. व्यवसाय करणाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार आहे. कामाच्या ठिकाणी मनाचा मोठेपणा दाखवून सहकाऱ्यांना माफ कराल.
कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस समाधानकारक असणार आहे. आज तुम्हाला अनपेक्षितपणे धनलाभ होईल. त्यामुळे मनात एक वेगळाच उत्साह निर्माण होईल. अनेक दिवसांपासून सुरु असलेले संपत्तीचे वाद आज संपुष्ठात येतील. त्यातून तुम्हाला फायदाच होईल. कामाच्या ठिकाणी तुमचे नेतृत्व आणखी मजबूत होईल. वरिष्ठांकडून एखादी मोठी जबाबदारी मिळेल. शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची चांगली प्रगती होईल. व्यापारात जोडीदाराकडून घेतलेला सल्ला फायदेशीर ठरणार आहे.
मकर राशीच्या लोकांसाठी आज फायद्याचा दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रत्येक गोष्टीत उत्साह आणि आत्मविश्वास जाणवेल. भागीदारीत असलेल्या व्यवसायात विशेष लाभ होईल. घरामध्ये आज शुभ कार्य घडून येईल. त्यामुळे कुटुंबातील सदस्य आनंदात असतील. वडील किंवा भावाकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. कामाच्या ठिकाणी विरोधक कुरघोड्या करतील. मात्र तुमच्या बुद्धी चातुर्याने तुम्ही त्यांचा डाव उलटून लावाल. बोलण्यात मृदूपणा ठेवणे लाभदायक ठरेल.
कुंभ राशीच्या लोकांसाठी आज गुरुवारचा दिवस विशेष असणार आहे. उद्योग-व्यापारात फायद्याच्या गोष्टी घडतील. एखाद्या महत्वाच्या कार्यात कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य लाभेल. त्यामुळे मानसिक धैर्य मिळेल. अनेक दिवसांपासुन असलेली एखादी समस्या आज अचानक दूर होईल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. घर किंवा जमीन खरेदीच्या विचारात असाल तर आज चांगली सकारात्मक घडामोड घडू शकते. नोकरीत वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल.
संबंधित बातम्या