Lucky Zodiac Signs : महिन्याचा शेवट आर्थिक स्त्रोत वाढीचा! आज 'या' ५ राशींच्या लोकांना भाग्याचा काळ
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : महिन्याचा शेवट आर्थिक स्त्रोत वाढीचा! आज 'या' ५ राशींच्या लोकांना भाग्याचा काळ

Lucky Zodiac Signs : महिन्याचा शेवट आर्थिक स्त्रोत वाढीचा! आज 'या' ५ राशींच्या लोकांना भाग्याचा काळ

Jun 30, 2024 04:00 AM IST

Lucky Rashi Bhavishya 30 June 2024 : आज नवमी तिथी असून, या दिवशी चंद्र-मंगळ योगासह सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. अशात या ५ राशीचे लोकं ठरतील लकी.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३० जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३० जून २०२४

आज ३० जून २०२४ रविवार रोजी, चंद्र मीन राशीनंतर मेष राशीत जाणार आहे, त्यामुळे चंद्राचा मंगळाशी संयोग होईल आणि चंद्र मंगळ योग तयार होईल. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षाची नवमी तिथी असून या दिवशी चंद्र-मंगळ योगासह सुकर्म योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि रेवती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याने महिन्याचा शेवट लाभदायक जाणार आहे.

वृषभः 

आज अडलेली कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंध असणाऱ्यांना उत्तम दिवस आहे. आनंदाच्या बातम्या ऐकायला मिळतील. मनातील अहंकाराची भावना टाळावी. आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील. शैक्षणिक कार्यात लक्षणीय प्रगती होईल. मन समाधानी राहील. सामाजिक किंवा राजकीय प्रसिद्धि मिळेल. मन प्रसन्न राहील. कुटुंबामध्ये तुमच्या सल्ल्याला महत्त्व राहील. परदेशगमनाचे योग येतील.

मिथुनः 

आज ग्रहयोग उत्तम आहे. किर्ती प्रसिद्धीचे योग संभवतात. खेळाडूंना आपापल्या क्षेत्रात वाव मिळेल. जुनी मित्रमंडळी भेटतील. अहंकार बाजूला ठेवला तर बऱ्याच गोष्टी साधून जातील. रसिकतेला उधाण येईल. मोठा आर्थिक लाभ होणार आहे. मनासारख्या घटना घडतील. नव्या योजना कार्यान्वित करु शकाल. व्यवसायात भरभराटी होण्याची शक्यता असून आकस्मिक धनलाभ होण्याचा योग आहे. आर्थिक प्रगती करणारा दिवस ठरेल. 

कर्कः 

आज आवडत्या व्यक्तीबरोबर वेळ मजेत घालवाल. घर किंवा वाहन खरेदी कराल. यशस्वी व्हाल. आर्थिक ओढाताण संपेल. मनात सकारात्मकता वाढेल. आपल्या प्रतिभेस वाव मिळेल. वैज्ञानिक क्षेत्रातील व्यक्तींकरिता प्रगतीकारक दिनमान आहे. आपला नावलौकिक वाढेल. गत काळात केलेल्या कार्यातून मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित प्रॉपर्टीत लाभ होईल. कामकाजाची परिस्थिती चांगली राहील. 

तूळ: 

आज जनमानसात प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. मान-सन्मान मिळण्याचे योग आहेत. प्रवासात पैशाचा व्यय होण्याचाच जास्त संभव आहे. दूरच्या प्रवासाचे योग येतील. कामात यश मिळाल्याने आनंदी राहाल. व्यापार उत्पन्नात वाढ होईल. आर्थिक स्त्रोत वाढेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार प्रारंभ करण्यासाठी यशस्वी दिवस आहे. 

वृश्चिकः 

आज गृहसौख्यात भर पडेल. काम केल्याचे समाधान मिळेल. प्रेम प्रकरणात यश येईल. वेळीच सावध राहायला हवे. जनसंपर्क वाढल्याने फायदा होईल. कामकाजात गुप्तता बाळगा. व्यापारासाठी प्रवास होण्याचा योग आहे. आर्थिक स्थिती चांगली राहील. किर्ती व मान सन्मान मिळेल. अतिरिक्त कामातून उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner