आज ३० जुलै २०२४ मंगळवार रोजी, चंद्र शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु आणि मंगळ आधीच उपस्थित आहेत. तसेच आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील दहावी तिथी असून या दिवशी वृद्धी योग, ध्रुव योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि कृतिका नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज लक्ष्मीयोग घटीत होत असून, फायदेशीर दिवस राहील. आर्थिक नियोजन उत्तम प्रकारे कराल. दूरच्या प्रवासाचे योग आहेत. कल्पना शक्ती आणि दूरदर्शी पणाच्या जोरावर लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. प्रियजनांच्या भेठीगाठी होतील. आज यश निश्चित लाभेल. आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. व्यवहार लाभदायक ठरतील.
आज व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. विश्वासदर्शक वातावरण राहील. मनासारखी कामे होतील. नवीन व्यक्तीशी संबंध प्रस्थापित होतील. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्यासाठी आवश्यक ती आवक झाल्याने समाधान लाभेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकांकडून मदत मिळेल. कार्यक्षेत्रात मन मग्न राहील. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचे चीज होईल.
आज यश मिळेल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. सयंमी राहिल्याने आर्थिक फायदा होईल. शुभ कार्यात सामील व्हाल. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल.
आज आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. लोकांमध्ये प्रसिद्धी मिळवाल. बांधकाम रिअल इस्टेट इत्यादी क्षेत्रातील व्यक्तींना भरभराटीचा दिवस आहे. खेळाडूसाठी यशाचा शिखर गाठण्यास भाग्याची उत्तम साथ लाभणार आहे. इच्छित नोकरी मिळेल. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत. वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल.
आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. करीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी उत्तम दिवस राहील. तुमच्या कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.