मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : अतिगंड योग आणि कौलव करणाच्या प्रभावात विजय मिळवाल, या ५ राशी नशीबवान ठरतील

Today lucky zodiac signs : अतिगंड योग आणि कौलव करणाच्या प्रभावात विजय मिळवाल, या ५ राशी नशीबवान ठरतील

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 30, 2024 11:28 AM IST

Lucky Rashi Today 30 january 2024 : आज ३० जानेवारी २०२४ मंगळवार रोजी, ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात कोणत्या ५ राशींच्या लोकांना नशीबाची साथ लाभेल, जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 30 january 2024
lucky zodiac signs today 30 january 2024

आज मंगळवार ३० जानेवारी रोजी, चंद्र बुध ग्रहाच्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे आणि मंगळ आणि गुरू एकमेकांच्या राशीमध्ये स्थित आहेत. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ८ वाजून ५४ मिनिटापर्यंत नंतर पंचमी तिथी सुरु होत असून, या दिवशी परिवर्तन योग व्यतिरिक्त सुकर्म योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. जाणून घ्या आजच्या नशीबवान ५ राशी कोणत्या आहेत.

वृषभः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ प्रभावामुळे दुसऱ्यांना मदत करण्यात कायम पुढे रहाल. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम केल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. वातावरणात चैतन्य निर्माण कराल. साहित्य क्षेत्रातील व्यक्तींना मोठे यश लाभेल. नोकरीत मना सारखी बदली किंवा पदोन्नती मिळण्याचे योग आहेत. व्यापारात आर्थिक आवक चांगली राहील. नवीन व्यवसायिक प्रस्ताव येतील. कुटुंबात सुखशांती व आनंदाचे वातावरण राहील. प्रवासातुन आर्थिक लाभ होऊ शकतो. वडिलांकडून आर्थिक मदत मिळेल.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात खंबीर मनाने सर्व नकारात्मक गोष्टींना तोंड द्याल. जनमानसात प्रभाव पाडाल. चिंतनातून सर्जनशीलता निर्माण कराल. तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. अडचणी अनेकदा संधी असू शकतात यावर विश्वास ठेवा. जास्तीत जास्त एकांतवास आवडेल. रोजगारात मनासारखी पदोन्नती व बदली होऊ शकते. सामाजिक कार्यातून मानसन्मान वाढेल. मित्रांच्या सहकार्यामुळे मनोधैर्य उंचावेल. आर्थिक लाभाची शक्यता आहे. कुटुंबात आनंदाचे सुख व समाधानाचे वातावरण राहील.

कर्क: 

आज आत्मविश्वास वाढेल. त्रासापासून सुटका होईल. प्रसिद्ध व्हाल. धीटपणे प्रसंगांना सामोरे जाल. मुलांची अभ्यासात प्रगती होईल. खेळाडूंना वेगवेगळ्या संधी मिळतील. कष्टाने ध्येयपूर्ती होईल. नवीन योजना हाती घ्याल. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. नियोजनाची व बुद्धिमत्तेची प्रशंसा होईल. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसा हक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. व्यवसायानिमित्त प्रवास होईल.

सिंहः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात लाभ होईल. त्यामुळे आनंदी उत्साही राहाल. नोकरीत सहकाऱ्यांचे सहकार्य उत्तम मिळेल. मित्रमंडळी बरेच दिवसांनी भेटतील. गप्पांमध्ये वेळ चांगला जाईल. वैवाहिक जीवनात कोणतेही टोकाचे निर्णय लगेच घेऊ नयेत. कलेत हाती घेतलेल्या कामात यशस्वी राहाल. नवीन प्रकल्प हाती येतील. केलेल्या कामाचे कौतूक होऊन मान सन्मान वाढेल. प्रतिभेस वाव मिळेल. वरिष्ठाकडून मोठी जबाबदारी मिळू शकते. नातेवाईकांशी संबंधात स्नेह वाढेल. संपत्तीबाबत असलेल्या कामात केलेली धावपळ फायदेशीर राहील. रोजगारात नवीन योजना राबवाल.

कन्या: 

आज आनंदी आणि उत्साही वातावरणामुळे कामाचा उत्साह वाढेल. खूप दिवसांपासून अडलेली ऑर्डर हातात पडेल. परदेशाशी संबंधित व्यवहारांना चालना मिळेल. व्यवसायाच्या ठिकाणी तरुणांचा आवडत्या व्यक्तीशी परिचय होईल. रोजगारात आर्थिक लाभ होईल. आपली स्थिती मजबूत होईल. कौटुंबिक सामजस्य राहील. व्यापारात वृद्धी होऊन अनुकुल स्थिती राहणार आहे. वेळेचा चांगला उपयोग करून आपल्या इच्छा अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून कामाला लागा. घर व वाहन खरेदीचा योग आहे. संवाद वाढेल आणि त्याचे रूपांतर प्रेमात होऊ शकते. मनात उर्जा निर्माण करणारा दिवस आहे.

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)