आज शुक्रवार ३० ऑगस्ट रोजी, चंद्र मिथुन राशीनंतर कर्क राशीत जाणार आहे. तसेच, सूर्य ग्रह सध्या सिंह राशीमध्ये स्थित आहे आणि पुढील राशीमध्ये शुक्र कन्या राशीमध्ये स्थित आहे, जो एक शुभ ग्रह आहे. सूर्यापासून पुढील राशीत शुभ ग्रह ठेवल्यास वेष योग तयार होतो. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून, या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, व्यतिपात योग आणि पुनर्वसु नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे.
आज मन प्रसन्न राहील. बौद्धिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तीस प्रकाशन साहित्यिक यांच्या करिता आनंदी दिवस आहे. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक स्त्रोत वाढेल. दाम्पत्य जीवन सुखी राहील. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.
आज आर्थिक बाबती मधील प्रकरणे सुरुळीत पार पडतील. कर्ज मंजूर होईल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. ठोस निर्णय घ्याल. मानसिक तनाव दूर होईल. जुने कर्ज परत मिळेल. विवाह जुळतील. भावंडाची योग्य साथ मिळेल. युवकांना काळ अतिशय अनुकूल आहे. नविन संधी आपल्याला मिळणार आहे. यशस्वी व्हाल. मानसन्मान वाढेल.
आज अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. संततीकडून समाधान सुख लाभेल. कार्य साध्य करण्याकरता मेहनत कराल. आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. गुंतवणुकीसाठी दिवस उत्तम राहील. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. तुमची पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल. पत्नीकडून सहकार्य लाभेल. बढतीचे योग आहेत. पद प्रतिष्ठा लाभेल.
आज भाग्यकारक घटना घडतील. आर्थिक स्थिती उत्तम होईल. वाणीचा आणि व्यक्तीमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल. जमीन खरेदी विक्रीतून अधिक लाभ होईल. व्यवसायात अनपेक्षीत फायदा होईल. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संतती विषयी चिंता मिटेल. कुटुंबामधून आपणास सुवार्ता मिळणार आहे.
आज व्यापाऱ्यांनी कौटुंबिक जीवनात आणि समृद्धी आणेल. मोठे अधिकारी तुम्हाला भेटू शकतात आणि प्रोत्साहन देऊ शकतात. आकस्मिक लाभ होतील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. अंत्यत शुभ दिवस आहे.