Lucky Zodiac Signs : श्रावणाचा शेवट होईल कौटुंबिक सौख्याने! या ५ राशींना योग्य संधी मिळेल, दिवस ठरेल लकी-lucky zodiac signs today 3 september 2024 astrology predictions for mesh vrishabh mithun kark dhanu rashi ,राशिभविष्य बातम्या
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : श्रावणाचा शेवट होईल कौटुंबिक सौख्याने! या ५ राशींना योग्य संधी मिळेल, दिवस ठरेल लकी

Lucky Zodiac Signs : श्रावणाचा शेवट होईल कौटुंबिक सौख्याने! या ५ राशींना योग्य संधी मिळेल, दिवस ठरेल लकी

Sep 03, 2024 09:37 AM IST

Lucky Rashi Bhavishya 3 September 2024 : आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, या दिवशी सिद्ध योग, साध्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असून, श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस ५ राशीच्या लोकांसाठी लकी राहील.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३ सप्टेंबर २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३ सप्टेंबर २०२४

आज मंगळवार ३ सप्टेंबर रोजी, चंद्र सिंह राशीत गेला आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असून, ही तिथी भौमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. भौमवती अमावस्येच्या दिवशी सिद्ध योग, साध्य योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार अमावस्येच्या दिवशी शुभ योग तयार झाल्याने ५ राशींना फायदा होणार आहे.

मेषः 

आज अपेक्षीत फायदा होईल. तुम्ही करीत असलेल्या कामाची पावती तुम्हाला मिळेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. मनातील योजना पार पाडता येणार आहेत. तशी काही आर्थिक तरतूद होणार आहे. अर्थिक कामात चांगले यश लाभेल. नोकरी व्यापारात कामाचा विस्तार वाढणार आहे. संततीकडून काही चांगल्या गोष्टी प्राप्त होतील. बौद्धिक प्रगती पाहून समाधान लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ: 

आज फायदे मिळवाल. आनंददायी वातावरण राहील. व्यापारात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भागीदारीत अपेक्षित लाभाचे योग आहेत. योग्य संधी चालून येतील. घर खरेदीची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण उत्साही राहणार आहे. जुने मित्र सहकारी भेटतील. स्थावर मालमला संपत्तीचे प्रश्न मार्गी लागेल. स्वसंपादिन धनाचा उपभोग घ्याल.

मिथुन: 

आज भाग्य साथ देईल. कामाला जास्त महत्त्व द्याल. मनावरचा ताण बर्‍या पैकी कमी झालेला असेल. सहकुटुंब प्रवासाचा बेत आखाल. कौटुंबिक पातळीवर जोडिदाराचं चांगले सहकार्य मिळणार आहे. सामाजिक कार्यात भाग घ्याल. खर्चावर मात्र नियंत्रण ठेवा. चैनीच्या वस्तू घेण्याकडे ओढ राहील. प्रेमप्रकरणात अनुकूलता येईल. 

कर्क: 

आज भाग्याची साथ चांगली मिळेल. एखादी मोठी गुंतवणक करण्यासाठी दिवस चांगला आहे. कार्यक्षेत्रात नाविन्यपूर्ण प्रयोग कराल. व्यापारात बदल होण्याची शक्यता आहे. केलेल्या कामाचे सकारात्मक परिणाम दिसतील. व्यापारात आर्थिकवृद्धी होईल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. महत्वाच्या कामानिमित्त प्रवास घडेल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. घरात आणि घराबाहेर उत्साहाचे आनंदी वातावरण राहील. 

धनु: 

आज नशिबाची साथ चांगली मिळेल. कौटुंबिक सुख मिळेल. जोडीदाराचे सहकार्यही उत्तम मिळेल. आनंदी राहाल. वाहन घर खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. कुंटुबातील वरिष्ठ सदस्यांकडून स्नेह प्राप्त होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. नावलौकिक वाढेल. विद्याभ्यासात प्रगती कराल. कला क्षेत्रातील व्यक्तिंना लाभ होईल. कौटुंबिक सौख्य व जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या.