आज बुधवार २ ऑक्टोबर रोजी, चंद्र कन्या राशीनंतर तूळ राशीत जाणार आहे. तसेच, अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी आहे आणि या दिवशी शारदीय नवरात्रीची सुरुवात होते. प्रतिपदा तिथीला घटस्थापना करून, दुर्गेचे पहिले रूप शैलपुत्री देवीचे पूजन केले जाते आणि व्रत पाळले जाते.
आज घेतलेले निर्णय योग्य ठरतील. अनेक मार्गांनी संधी येतील. रखडलेली कामे मार्गी लागतील. रोजगारात प्रगती होईल. कर्तुत्व सिद्ध कराल. हाती घेतलेल्या कार्यात यश संपादन कराल. नवीन योजना आर्थिक बाबतीत फायदेशीर ठरणार आहेत. कुटुंबातील सदस्याकडून उत्तम सहकार्य लाभल्याने स्नेह वाढेल. भाऊबहिणीकडून आर्थिक सहकार्य लाभेल.
आज नोकरी व्यापारात योग्य प्रतिसाद मिळेल. महत्त्वपूर्ण कार्यात विशेष यश मिळेल. जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांना अनुकूल दिनमान आहे. मुलांच्या बाबतीत प्रसन्नतापूर्वक वातावरण राहणार आहे. कुटुंबात शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मनोरंजनाकडे कल वाढेल. फिरण्याचा उत्तम योग आहे. धार्मिक कार्य करण्याची संधी मिळेल.
आज अत्यंत अनुकुल दिवस आहे. नशिबाची साथ लाभणार आहे. कष्टाचे चीज होईल. स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. नवीन योजना फायदेशीर ठरतील. व्यापारात काही नवीन भागीदारासोबत संबंध प्रस्थापित कराल. गृहसौख्य जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांची विद्याभ्यासात प्रगती होईल. कलाकारांना योग्य संधी मिळतील. बेरोजगारांना नोकरीचे योग आहेत.
आज नशीबाची चांगली साथ मिळेल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. व्यावसायिक स्पर्धेत यश मिळण्याची आज संधी आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. आपल्या कामात उत्साह वाढणार आहे. विचारपूर्वक केलेली मोठी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. प्रवास सुखकर व हितकारक ठरतील. सामाजिक मान सन्मान मिळेल. आर्थिक आवक वाढेल.
आज भाग्याची चांगली साथ मिळेल. नोकरीच्या संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. ठरविलेल्या गोष्टी मनाप्रमाणे पूर्ण होणार आहेत. रिअल इस्टेट जमीन जागा खरेदी विक्री करिता आजचा दिवस फायदेशीर ठरेल. कामे पूर्णत्वास जातील. पदप्राप्ती मानसन्मान मिळेल. उर्जात्मक आणि उत्साही दिवस आहे.
संबंधित बातम्या