मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs: आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल; या ५ राशीच्या लोकांना मिळेल नोकरीत बढती

Lucky Zodiac Signs: आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल; या ५ राशीच्या लोकांना मिळेल नोकरीत बढती

HT Marathi Desk HT Marathi
May 03, 2024 03:13 PM IST

Lucky Zodiac Signs Today 3 May 2024 : चंद्राचा कुंभ राशीत प्रवेश आणि चंद्र प्लुटोचा शुभयोग यामुळे ५ राशींवर अतिशय चांगला परिणाम दिसून येत आहे. पाहूया या लकी राशी कोणत्या आहेत.

आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल; या ५ राशीच्या लोकांना मिळेल नोकरीत बढती
आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल; या ५ राशीच्या लोकांना मिळेल नोकरीत बढती

Lucky Zodiac Signs Today 3 May 2024 : आज कृष्ण पक्ष दशमी तिथी असुन चंद्र कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहयोग पाहता चंद्रमा शनिशी युती तर प्लुटोशी षडाष्टक योग करीत आहे. दरम्यान विषयोग नामक योग घटीत होत आहे. ग्रह-तारकांच्या या सर्व हालचालींचा प्रत्येक राशीवर कमी अधिक प्रमाणात प्रभाव पडतच असतो. यामध्ये काही राशी लकी ठरतात तर काहींना त्रास सहन करावा लागतो. आज ५ लकी राशी पाहणार आहोत.

मेष

आजच्या पाच लकी राशींमध्ये मेष राशीचादेखील समावेश होतो. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यवायिकांना मोठा आर्थिक फायदा होईल. नवनवीन प्रस्ताव मिळतील. आयुष्यात भरभराटी होईल. प्रकृती ठणठणीत राहील. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.

वृषभ

आज चंद्र आणि प्लुटोच्या शुभयोगामुळे वातावरण अनुकूल राहील. कोणत्याही कामात सक्रियतेने भाग घ्याल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मुलांसोबत संबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. उद्योग-व्यवसायात आर्थिक नफा होईल. विवाहित पुरुषांना पत्नीची साथ मिळेल. संबंध अधिक दृढ होतील. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कामासाठी पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.

कन्या

आज प्लुटो आणि चंद्राच्या संयोगाचा कन्या राशीला विशेष फायदा होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. ऑफिसकामात व्यग्र राहाल. मन आनंदी असेल. औद्योगिक क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल. उद्योग-व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल.त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी दिवस शुभ आहे. समाजातील प्रतिष्ठा वाढेल.

तूळ

तूळ राशीवर चंद्रगोचर आणि प्लुटोचा शुभयोग दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. कुटुंबातील वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. उत्साहवर्धक घटना घडतील. नोकरीत पदोन्नती होईल. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कलाक्रीडा क्षेत्रातील लोकांना धनलाभ होईल. राजकीय व्यक्तींना यश मिळेल.

धनु

चंद्रबल आणि ब्रह्मयोग शुभ असल्याने कोणत्याही कामात यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिवस उत्तम आहे.कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडून येतील. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. देवावरील विश्वास अधिक मजबूत होईल.

WhatsApp channel