आज शुक्रवार ३ मे रोजी, गुरु वृषभ राशीत असल्यामुळे कुबेर योगासारखा फलदायी लाभ योग तयार झाला आहे, ज्याला धन योग म्हणतात. त्याच वेळी, चंद्र शनिदेवाच्या कुंभ राशीत भ्रमण करत आहे, जिथे शनिदेव आधीच उपस्थित आहेत. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षाची दहावी तिथी असून या दिवशी धन योगासह ब्रह्मयोग, ऐंद्र योग आणि शतभिषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार शुभ योग तयार होत असल्याने ५ राशींना दिवस लाभदायक ठरेल.
आजच्या पाच लकी राशींमध्ये मेष राशीचा देखील समावेश होतो. मेष राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कामाच्या ठिकाणी रखडलेली कामे पूर्ण होतील. व्यावसायिकांना मोठा आर्थिक फायदा होईल. नवनवीन प्रस्ताव मिळतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. प्रकृती ठणठणीत राहील. तुम्ही करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल.
आज चंद्र आणि प्लुटोच्या शुभयोगामुळे वातावरण अनुकूल राहील. कोणत्याही कामात सक्रियतेने भाग घ्याल. जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. मुलांसोबत संबंध सुधारतील. कामाच्या ठिकाणी सहकार्य लाभेल. उद्योग-व्यवसायात आर्थिक नफा होईल. विवाहित पुरुषांना पत्नीची साथ मिळेल. संबंध अधिक दृढ होतील. लेखन क्षेत्रातील व्यक्तींना त्यांच्या कामासाठी पुरस्कार मिळण्याची शक्यता आहे.
आज प्लुटो आणि चंद्राच्या संयोगाचा कन्या राशीला विशेष फायदा होईल. आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. ऑफिस कामात व्यग्र राहाल. मन आनंदी असेल. औद्योगिक क्षेत्रातील लोकांची प्रगती होईल. उद्योग-व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळेल, त्यामुळे आत्मविश्वास वाढेल. नव्या कार्याची सुरुवात करण्यासाठी दिवस शुभ आहे. समाजातील प्रतिष्ठा वाढेल. मानसन्मानात वाढ होईल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे.
तूळ राशीवर चंद्रगोचर आणि प्लुटोचा शुभयोग दिसून येत आहे. कामाच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. कुटुंबातील वरिष्ठांची मर्जी सांभाळाल. उत्साहवर्धक घटना घडतील. नोकरीत पदोन्नती होईल. व्यवसायात गुंतवणूक केल्यास फायदा होईल. कलाक्रीडा क्षेत्रातील लोकांना धनलाभ होईल. राजकीय व्यक्तींना यश मिळेल.
चंद्रबल आणि ब्रह्मयोग शुभ असल्याने कोणत्याही कामात यश मिळेल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यास दिवस उत्तम आहे.कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडून येतील. धार्मिक ठिकाणी प्रवास होईल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. देवावरील विश्वास अधिक मजबूत होईल.
संबंधित बातम्या