आज रविवार ३ मार्च रोजी, कुंभ राशीत सूर्य आणि शनि यांच्या संयोगामुळे शश आदित्य राजयोग तयार होत आहे. तसेच आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी शश आदित्य योगासह हर्ष योग, त्रिग्रही योग आणि अनुराधा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.
आज भाग्याची साथ चांगली मिळेल. इच्छा पूर्ण होण्याचा काळ आहे. त्यामुळे मूड चांगला राहील. उद्योग धंद्यात विशेष लाभ मिळेल. व्यापारात चांगले बदल मोठे फायदेशीर ठरतील. वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे. आत्मविश्वासात वाढ होवून, मन प्रसन्न राहील. कौटुंबिक समस्या आणि स्थावर मालमत्ता या संबंधातील समस्या दूर होतील. समाजात मानसन्मान प्रतिष्ठा मिळाल्याने आनंदी राहाल.
आज ध्येय गाठण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. कुटुंबाची साथ तुम्हाला चांगली मिळेल. वडिलोपार्जित मालमत्तेसंबंधाच्या कामाला गती येईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. फायदेशीर प्रवास होऊ शकतो. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीशी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. शुभ दिवस आहे.
आज लकी राशीभविष्यानुसार, ग्रह-नक्षत्राच्या योग-संयोगात शेअर मार्केट मध्ये पैसा मिळेल. बौद्धीक आणि कलेच्या क्षेत्रात उत्तम प्रगती आणि नावलौकिक लाभेल. नोकरी ठिकाणी वातावरण उत्साही आनंदी राहिल्यामुळे काम करण्याचा उत्साह वाढेल. आर्थिक लाभ होईल. इच्छेप्रमाणे कार्य घडतील. मित्रमैत्रिणींमधील वाद संपतील. व्यापारात आर्थिक लाभाची सुखद संधी मिळेल. कौटुंबिक सौख्य समाधानकारक राहील. दुरवरचे प्रवास लाभदायक राहतील व भौतिक सुख उत्तम मिळेल.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात विद्यार्थ्यांना अभ्यासाबाबत गोडी निर्माण होईल. बौद्धीक क्षेत्रात प्रगतीच्या संधी निर्माण होतील. व्यायाम आणि औषधोपचार या दोहोंची साथ मिळेल. आपल्या प्रयत्नांना यश लाभेल. कामानिमित्त केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. अपेक्षित लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर वातावरण चांगले राहील. संततीकडून आनंदाची बातमी कळेल.
आज जोडीदाराचे सहकार्य उत्तम मिळेल. आर्थिक फायदा चांगला होईल. कामाचे उत्तम नियोजन कराल. मालमत्ते संबंधी अचानक काही समस्या उद्भवू शकतात. मनाजोग्या अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहणार आहे. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. वैवाहिक सुखात वाढ होईल. लाभाचा दिवस आहे.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
संबंधित बातम्या