Lucky Zodiac Signs : 'या' ५ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस, सूचक स्वप्न पडतील! पाहा आजच्या लकी राशी
मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : 'या' ५ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस, सूचक स्वप्न पडतील! पाहा आजच्या लकी राशी

Lucky Zodiac Signs : 'या' ५ राशीच्या लोकांसाठी प्रगतीचा दिवस, सूचक स्वप्न पडतील! पाहा आजच्या लकी राशी

Jun 03, 2024 11:41 AM IST

Lucky Rashi Bhavishya 3 June 2024 : आज सूर्य बुध आणि शुक्राशी युती करत आहे. अशामध्ये सर्वार्थसिद्धी योग आणि आयुष्मान योग घटित होत आहे. अशात आजचा दिवस ५ राशींसाठी लकी ठरणार आहे.

नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३ जून २०२४
नशीबवान राशी, लकी राशीभविष्य ३ जून २०२४

आज सोमवार ३ जून २०२४ रोजी, मंगळ स्वतःच्या राशीत मेष राशीत असेल, त्यामुळे राजयोग तयार होत आहे. चंद्र मेष राशीत आणि शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करेल. तसेच आज वैशाख कृष्ण पक्षातील भागवत एकादशी आहे. या दिवशी रुचक राजयोगासोबत सौभाग्य योग, शोभन योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. ज्योतिष शास्त्रानुसार आज या राशींना लाभ होणार आहे.

मेषः 

आज आर्थिक कामे मार्गी लागतील. एखादा दृढनिश्चय कराल. कौतुकास पात्र व्हाल. हसतमुख राहून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण कराल. कौटुंबिक सहकार्याने चांगला दिवस जाणार आहे. परदेश भ्रमणासाठी उत्तम दिवस आहे. मित्रमैत्रिणींबरोबर सलोख्याचे संबंध होतील. व्यापारात आर्थिक लाभ होईल. जुनी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. कर्ज प्रकरण मंजुर होतील. 

कर्कः 

आज अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. कायदेशीर प्रक्रीयेत निकाल आपल्या बाजुने लागेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढतील. 

कन्याः 

आज मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल. इतरावर आपला प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. 

वृश्चिकः 

आज नोकरदार नोकरी बदलाचा विचार करीत असाल तर उत्तम योग आहे. कलाकरांना अनेक संधी लाभतील. परदेशगमनाचे योग संभवतात. खूप दिवसांपासून मनात असलेली एखादी गुंतवणूक करण्यास उत्तम दिवस आहे. आर्थिक बाबतीत काटेकोर राहाल. परदेश भ्रमणाचे योग आहेत. प्रवासातुन आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल.

मकरः 

आज सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. व्यवसायिकांना नियोजनात्मक पद्धतीने केलेल्या कामामुळे आर्थिक यश मिळेल. नविन योजनेतून लाभ होईल. कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक वृद्धी होईल. नियोजन उत्तम केले तर निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत. 

Whats_app_banner