आज ३ जुलै २०२४ बुधवार रोजी, चंद्र शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे गुरु आधीच उपस्थित आहे. गुरु आणि चंद्र एकाच राशीत असल्यामुळे गजकेसरी नावाचा योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशी तिथी असून, या दिवशी गजकेसरी योगासह सर्वार्थ सिद्धी योग आणि रोहिणी नक्षत्राचाही शुभ संयोग असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आज प्रदोष व्रतही आहे, अशात आजचा दिवस या ५ राशीच्या लोकांना लकी ठरेल.
आज भाग्यकारक घटना घडतील. मनस्वास्थ उत्तम राहील. नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. प्रमोशन बढती पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. व्यापारात आर्थिक लाभ होतील. जुनी येणी येतील. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. आकस्मिक आर्थिक लाभ होतील.
आज नोकरीत अतिरिक्त कामाची जबाबदारी मिळेल. बढतीची संधी आहे. आप्तेष्ट मित्रपरीवारांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक जिवन आनंदी राहील. प्रेमप्रकरणात यश लाभेल. संततीविषयी चिंता मिटेल. कोर्टकचेरीची प्रकरण असतील तर निकाल आपल्या बाजूने लागेल. जमीन खरेदी-विक्रीतून अधिक लाभ होईल. शिक्षक वर्गाचा मान-सम्मान वाढेल. मानधन वाढेल. यशस्वी दिनमान आहे.
आज प्रगतीकारक दिवस आहे. धनवृद्धी होईल. मनात उर्जा आणि सकारात्मकता वाढेल. विद्यार्थी अभ्यासापेक्षा दुसऱ्या क्षेत्रात जास्त रमतील. शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्यांना विशेष संधी मिळतील. कामातील योग्य नियोजन आणि शिस्त कामाची गती वाढवेल. वाहन घर खरेदी साठी शुभ दिवस आहे. आर्थिक सहकार्य लाभेल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदाराबद्दल प्रेमभावना वाढेल. नोकरवर्गाकरिता आनंदाची बातमी मिळेल. कुटुंबातील वातावरण उत्साहवर्धक व आनंददायक राहील.
आज विवाह इच्छुकांचे विवाह जुळतील. मनातील सुप्त इच्छा पूर्ण होण्याचे योग आहेत. आर्थिक वाढीची बातमी ऐकायला मिळेल. कामानिमित्त परदेश गमनाच्या संधी मिळतील. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. व्यापारात तुमच्या हुशार व्यक्तिमत्वाचे दर्शन घडेल. घरात जवळच्या माणसांचे उत्तम सहकार्य मिळेल. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. आरोग्यही उत्तम राहील.
आज तुमच्या कर्तृत्वाला वाव देणाऱ्या गोष्टी घडतील. आनंदी आणि उत्साही वातावरणात काम करत राहिल्यामुळे कामाचा दर्जा वाढेल. कामाची उत्तम अंमलबजावणी कराल. एखाद्या प्रश्नातून सावधपणे मार्ग काढून तो प्रश्न व्यवस्थित हाताळाल. मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील. वैवाहीक जीवन सुखी राहील. आरोग्य उत्तम राहील.