आज ३ जानेवारी २०२४ बुधवार रोजी, चंद्र कन्या राशीत संक्रमण करणार आहे. तसेच मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून, या दिवशी शोभन योग, रवि योग, सर्वार्थ सिद्धी योग, लक्ष्मी नारायण योग आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्व वाढत आहे. ग्रह-नक्षत्राच्या शुभ संयोगाचा ५ राशींना शुभ लाभ होत आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुक्ष योगात उत्तम दिवस आहे. वडिलोपार्जित मालमत्तेबाबतचा जुना वादही मिटू शकतो. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव वाढणार आहे. कार्यक्षेत्रात वाढ होईल. नवीन समुहाशी जोडले जाण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. शासकीय दप्तरी रखडलेली कामे मार्गी लागतील. पती पत्नीतील संबंध दृढ होतील. आजच दिनमान आत्मविश्वासाने परिपूर्ण राहील. आरोग्य उत्तम राहील. नियोजन झाकून ठेवून काम करावे आणि यश मिळवावे. विरोधकांवर मात कराल. नेतृत्वगुण विकसित होईल. नवीन प्रकल्पांमध्ये सहज व्यवहार करू शकाल. कौटुंबिक जीवन फार चांगले असेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींचा मान-सन्मान व प्रतिभा वाढेल. नोकरीत वेगळ्या कल्पना नक्की मांडा. वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. पदोन्नती व पगारवाढीचा योग आहे.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग फायदेशीर ठरेल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. मित्रमैत्रिणींकडून आर्थिक लाभ होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. कुटूंबात सामंजस्याचं वातावरण निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळतील. आपल्या कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध कराल. व्यापारात उत्पन्नाचे स्त्रोत वाढविण्यात यश येईल. कार्यक्षमतेमुळे फायदा होईल. पालकांकडून भरपूर सहकार्य मिळेल. नवीन कार किंवा घर घेण्याचे धैर्य वाढवू शकाल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींच्या मान सन्मानात वाढ होईल. व्यापारात नवीन भागीदारासोबत नवीन प्रकल्पाची सुरुवात कराल. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपक्षेप्रमाणे यश येईल. दिवसभर मन प्रसन्न राहील.
आज लाभदायक दिवस आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेत यश मिळवू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेशी संबंधित वाद मिटतील. कोणतेही काम करण्यासाठी आत्मविश्वास वाढेल. उत्पन्नाचे अधिक स्रोत विकसित करण्याच्या स्थितीत असाल. नवीन कार किंवा घर खरेदी करण्यासाठी शुभ योग आहे. पैसे चांगल्या कामांवर खर्च कराल. नोकरीत अनुकूल वातावरण लाभेल. शासकीय सेवेत नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. भांवडाकडून मदत मिळेल. व्यापारात तुम्हाला भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. लेखक कला क्षेत्रातील व्यक्तींना शासकीय मानसन्मान मिळेल. आजचा दिवस ठरविल्याप्रमाणे कामे पार पाडण्यात उपयुक्त असा आहे. आर्थिक लाभ होतील. उन्नतीकारक दिवस आहे. कर्मावर विश्वास ठेवा. आपल्या कार्यक्षेत्रात धाडसी निर्णय घ्याल. आशाजनक वातावरण निर्माण होईल.
आज ग्रह-नक्षत्र उत्तम प्रभावी राहतील. नशीबाचे पाठबळ लाभणार आहे. नोकरीत मनाजोगे घडेल. नवीन प्रयोग यशस्वी होतील. पदोन्नती व बदलीसाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात काहीतरी नवीन करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला ठरू शकतो. विरोधकही शांत होतील. परदेशात नोकरी किंवा शिक्षणासाठी इच्छुक असलेल्यांनी प्रयत्न करावेत. राजकारणात काम करणाऱ्यांना यश मिळेल. धार्मिक सामाजिक कार्यात सक्रियतेने भाग घ्याल. मित्रमंडळीचे सहकार्य लाभेल. प्रेमप्रकरणात यश येईल.स्वतःच्या मनाने विचाराअंतीच निर्णय घ्या. आहारावर नियंत्रण ठेवा. साहित्यिक संपादन या बौद्धिक अधिष्ठान असणाऱ्या कार्यक्षेत्रात आपल्या कार्याचा विस्तार वाढेल. मानधनात वाढ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. दुरचे प्रवास घडतील. देश-विदेशात फिरण्याचे योग आहेत.
आज ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोग फायदेशीर राहणार आहे. प्रयत्नांच्या तुलनेत लाभ अधिक होईल. प्रमोशन मिळेल. वरिष्ठाकडून सहकार्य लाभेल. कामाच्या ठिकाणी कौतुक केले जाईल. कुटुंबातील वातावरण समाधानी असेल. आपल्या समोर नवीन व्यवसायाच्या प्रस्ताव येईल. व्यवसायिकांना काळ अनुकूलच आहे. तुमच्या कामाची प्रशंसा केली जाईल. आपल्याला आठवण येत असलेल्या पूर्वीच्या मित्र-मैत्रिणींच्या व आप्तेष्टांच्या गाठी-भेटी होतील. व्यावसायिक जोडिदार किंवा भागीदारासोबत नवीन व्यापार प्रारंभास दिनमान अनुकुल राहील. पत्नीचा सल्ला फायदेशीर ठरेल. सर्वच स्तरातील नातेसंबंधात स्नेह निर्माण होईल. कुटुंबातील वातावरण स्नेहपूर्वक राहील. व्यवहार कोणाच्याही नकळत केल्यास मोठा आर्थिक लाभ होईल. कामाप्रती सजग रहा. कुटुंबात मंगलकार्याचे आयोजन कराल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)