आज शनिवार ३ फेब्रुवारीला चंद्र तूळ राशीनंतर वृश्चिक राशीत प्रवेश करणार आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी वृद्धी योग, लक्ष्मी नारायण योग आणि विशाखा नक्षत्राचा योगायोग आहे, त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने फायदा होणार आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात कार्यक्षेत्रात उत्तम ठसा उमटवाल. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याचा मूड राहील. मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी होतील. फायदा करून घेणार आहात. व्यवहारात स्त्रियांच्या मध्यस्थीमुळे मनासारखी कामे होतील. अनुकुल घटना घडतील. वाहन खरेदीचे योग आहेत. कामकाजात अनुकुल स्थिती राहील. कुटुंबात वेळेचे नियोजन उत्तम कराल. निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. व्यापाराचा विस्तार होईल. आर्थिक लाभ व मानसन्मान मिळेल. आनंदाची बातमी मिळेल.
आज कष्टाचे चीज होईल. आर्थिक स्थिती सुधारेल. एखादी फायदेशीर गुंतवणूक कराल. कर्तुत्वाला साजेसे कार्य कराल. प्रतिष्ठीत लोकांच्या संपर्कात आल्याने प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य मिळेल. व्यापारात अती उत्साहीपणाने निर्णय घेऊ नका. धनलाभाचा योग आहे. भांवडाकडून आर्थिक सहकार्य लाभेल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लेखन क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना उत्तम दिवस आहे.
आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात नोकरी व्यवसायात मनासारखे कार्य झाल्यामुळे तब्येत खूष राहील. महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. नवीन गृहपयोगी वस्तु खरेदी कराल. सामाजिक कार्यातील व्यक्तींना मोठी पदप्राप्ती, मानसन्मान आणि प्रसिद्धी मिळेल. फायदेशीर प्रवास होण्याची शक्यता आहे. मित्रमंडळींचे सहकार्य लाभणार आहे. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. आकस्मिकरित्या धनलाभाचा योग आहे. व्यापारात काही नवीन योजना पूर्णत्वास जातील.
आज धार्मिक आणि आध्यात्मिकतेची जास्त आवड निर्माण होईल. व्यापारात वाढ करणारा दिवस राहील. आपणास मेहनतीनुसार चांगल्या फलांची प्राप्ती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यापारी वर्गात व्यवसायात अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल करावी. कौटुंबिक जिवन अनुकुल राहणार आहे. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नातेवाईक आप्तेष्ट यांची साथ मिळेल. आर्थिक उलाढालीतून फायदा होईल. सहकाऱ्यांसोबतचे वादविवाद मात्र टाळावे. आर्थिक बाबतीत लाभाच्या दृष्टीकोनातून उत्तम दिवस राहील.
आज कामात यशस्वी व्हाल. कोणत्याही गोष्टीसाठी पराक्रमाची शर्थ कराल. यशाकडेच वाटचाल राहील. मुलांच्या प्रगतीमुळे प्रसन्न वातावरण राहणार आहे. परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे. नवीन योजनेच्या दृष्टीने लाभदायक दिवस आहे. इस्टेटीतून वारसाहक्कातुन धनलाभ संभवतो. आधुनिक वस्तुंचा लाभ होईल. व्यापारात उधारी वसूल होईल. नातेवाईक आप्तेष्टांकडून सहकार्य लाभेल. सार्वजनिक कामात आपला नावलौकिक वाढेल. अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तिंच्या भेटी घडतील. कार्य पद्धतीवर लक्ष केंद्रित केल्यास अनपेक्षीत लाभ होतील. नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)