आज बुधवार ३ एप्रिल रोजी, चंद्र शनीच्या मकर राशीत प्रवेश करणार आहे तर शुक्र त्याच्या उच्च राशीत मीनमध्ये विराजमान आहे, त्यामुळे मालव्य राजयोग तयार होत आहे. मालव्य राजयोग हा पंचमहापुरुष योगांपैकी एक मानला जातो. तसेच आज मालव्य राजयोगासह सिद्ध योग, शिवयोग आणि उत्तराषाढा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्व वाढले आहे. ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने दिवस लाभदायक जाणार आहे.
आज वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. गुंतवणुकीकरिता योग्य दिनमान आहे. व्यवसायात धाडसी निर्णय घ्याल. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल.
आज कामे मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात वेगवेगळ्या संधी मिळतील. कामात यश मिळण्याचे योग आहेत. प्रयत्न फायदेशीर राहतील. मित्रपरीवारांकडून उत्तम सहकार्य लाभेल. कुटुंबात धार्मिक कार्य घडेल. प्रवासातुन लाभ होईल. परदेश भ्रमणाची शक्यता आहे. स्पर्धापरिक्षेत प्राविण्य मिळेल. कौटुंबिक सौख्य वाढेल.
आज घरात उंची वस्तूंची खरेदी कराल. घर सजवण्याचे स्वप्न साकार होईल. धंद्यात तेजी येईल. नोकरी व्यवसायात आपला वेगळा ठसा उमटवाल. अल्प मुदतीची गुंतवणूक फायदेशीर ठरणार आहे. रोजगारात तुमची प्रगती होईल. आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम प्रदर्शन कराल. व्यवसायात वृद्धी होईल. पदोन्नती व प्रगती होईल. विद्यार्थांना नवनवीन क्षेत्रात यश संपादनाची संधी मिळेल.
आज कार्यक्षेत्रात कौतुकास्पद कामगिरी कराल. जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. नोकरीत योग्य मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता उत्तम योग आहे. व्यापारात नवीन संधी व यश मिळेल. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. भावाकडून नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळेल. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल.
आज यश मिळेल. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. उद्योग व्यापारात अर्थिक स्तोत्र निर्माण होतील. व्यापारात आर्थिक लाभ नक्की होईल. इच्छित फळ मिळेल. कुटूंबात स्नेह वाढेल. कुटुंबातून आपल्या कार्यास प्रोत्साहन मिळेल. आर्थिक व्यवहार करण्यास उपयुक्त दिवस आहे. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल.