Lucky Rashi Bhavishya in Marathi : शुक्रवार, दिनांक २९ नोव्हेंबर हा दिवस ५ राशीच्या लोकांसाठी खूप छान असणार आहे. म्हणजेच आज या ५ राशींना लाभ होणार आहेत. त्यांच्या जीवनात आनंद येईल. व्यवसाय आणि नोकरीत लाभ होण्याची शक्यता आहे. २९ नोव्हेंबर २०२४ च्या या ५ भाग्यशाली राशी आहेत - मेष, वृषभ, सिंह, तूळ आणि कुंभ.
मेष राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस अतिशय आनंदाचा आहे. याचे कारण म्हणजे आज या जातकांची पगारवाढ होण्याची शक्यता आहे. या बरोबर आज पॉकेटमनी देखील वाढण्याची शक्यता आहे. आज तुम्ही ध्यानधारणा केल्यास तुम्हाला त्याचे चांगले लाभ मिळणार आहेत.
शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी या राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतूनही या दिवशी लाभ होण्याची शक्यता आहे. मुलांशी संबंधित कोणतीही कामगिरी त्यांच्यासाठी सन्मानाची बाब असेल. त्यांना कुठल्यातरी सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावायला मिळेल, त्यांचाही सन्मान होईल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल.
सिंह राशीच्या जातकांना आज शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी चांगली बातमी कानावर पडणार आहे. म्हणून आजचा दिवस चांगला जाणार. सिंह राशीचे जातक आज आनंदी राहतील, याचा अर्थ त्यांच्या समस्या कमी होऊ शकतात, ज्यामुळे ते सुटकेचा नि:श्वास सोडतील. नोकरीत अधिकारी त्यांच्या कामावर खूप खुश राहतील. हा दिवस प्रेमींसाठी संस्मरणीय बनू शकतो कारण त्यांचे प्रेम त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मंजूर होऊ शकते.
या राशीचे लोक त्यांचे जुने कर्ज फेडण्यात यशस्वी होतील, ज्यामुळे त्यांना खूप आनंद होईल. ते त्यांच्या कुटुंबासह काही मजेदार सहलीला देखील जाऊ शकतात. लव्ह लाईफची परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. हे लोक पालकांच्या मदतीने नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. आरोग्यही पूर्वीपेक्षा बरे होईल.
कुंभ राशीचे जातक यावेळी नवीन मालमत्ता खरेदी करू शकतात. उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात. तब्येत ठीक राहील. मुलांशी संबंधित कोणतीही गोष्ट तुम्हाला आनंदित करेल. मुलांकडून आनंद मिळेल. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडून भेटवस्तू देखील मिळू शकते. रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.
Disclaimer: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे खरी आणि अचूक असल्याचा आमचा दावा नाही. सविस्तर व अधिक माहितीसाठी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.