आजच्या साध्य योगात कुंभ राशीच्या जातकांना बऱ्याच गोष्टी साध्य करता येतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. प्रयत्नांना यश निश्चित आहे. उद्योग-व्यवसायातील आर्थिक अडचणी दूर होतील. मनोधैर्य वाढलेलं असेल. न्यायालयीन प्रकरण सुरू असल्यास निकाल आपल्या बाजूनं लागेल. नातलगांकडून शुभवार्ता मिळतील. नोकरीच्या ठिकाणी येत असलेल्या अडचणी दूर होतील. व्यावसायिकांसाठी दिवस अनुकूल असेल. व्यवसायात नव्या योजनांवर काम केल्यास त्याचा फायदा होईल. कौटुंबिक वातावरण सुखासमाधानाचं राहील. शुभ रंगः निळा शुभ दिशाः नैऋत्य. शुभ अंकः ०४, ०८.
राहु-केतूचा राशी बदल फलदायी ठरेल. उद्योजकांना त्यांच्या कर्मचाऱ्यांची चांगली साथ मिळेल. एखादं शुभ काम करण्याचं मनात असेल तर थांबू नका दिवस चांगला आहे. खरेदीसाठी देखील उत्तम दिनमान आहे. लोकसंग्रहाचा फायदा होईल. शांतपणे काम करा. व्यवसायानिमित्त प्रवासाचा योग आहे. आर्थिक चणचण जाणवणार नाही. साहित्य व कला क्षेत्रीतल व्यक्तींचा मानसन्मान होईल. कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. हातून चांगलं कार्य घडेल. जास्तीचे कष्ट उत्तम मोबदला मिळवून देतील. शुभ रंगः केसरी शुभ दिशाः दक्षिण. शुभ अंकः ०२, ०९.
चंद्रभ्रमण आज सुखदायी ठरेल. दिवसभर सकारात्मक राहाल. तुमच्या सुप्त गुणांना वाव मिळेल. विज्ञानाच्या क्षेत्रातील लोकांसाठी प्रगतीकारक दिनमान आहे. लोकप्रियता वाढेल. पूर्वपुण्याईतून मोठे लाभाची शक्यता आहे. वारसा हक्काच्या संपत्तीत वाटा मिळेल. रोजगारात प्रगती होईल. जुन्या परिचितांच्या गाठीभेटी होतील. कलागुणांना वाव मिळेल. अध्यात्मिक लेखन हातून होईल. अत्याधुनिक वस्तूंचा लाभ होईल. शुभ रंगः नारंगी शुभ दिशाः वायव्य. शुभ अंकः ०४, ०५.
शुभवार्ता कानी पडेल. आर्थिक लाभाचाही योग आहे. नोकरीतील वातावरण उत्साह वाढवणारं असले. शैक्षणिक कार्यात चांगली प्रगती होईल. कामाच्या निमित्तानं कुटुंबापासून दूर राहाल. पण त्यामुळं प्रेम वाढेल. मित्रमैत्रिणींमधील संबंध दृढ होतील. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. घराच्या संदर्भातील प्रश्न मिटतील. आज तुमच्या हातून काही तरी खास काम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिका भागीदाराची उत्तम साथ मिळेल. त्यामुळं तुमचा उत्साह वाढेल. शारीरिक कष्ट केल्यास फायदेशीर ठरेल. शुभ रंगः पांढरा शुभ दिशाः वायव्य. शुभ अंकः ०४, ०७.
तुला राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस प्रगतीकारक व यशदायी आहे. सामाजिक पातळीवर मानसन्मान मिळेल. नोकरीच्या ठिकाणी केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल. कामातील यशामुळं आनंदी राहाल. व्यावसायिक उत्पन्न वाढेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. कुटुंबातील वातावरण आनंदाचं राहील. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य दिवस आहे. नोकरदार असाल तर पगार वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. त्यामुळं मनासारखा खर्च करून आनंद मिळवाल. शुभ रंगः गुलाबी शुभ दिशाः पश्चिम. शुभ अंकः ०२, ०७.
(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)