आज बुधवार २९ मे २०२४ च्या चंद्रभ्रमणावर गुरु ग्रहाची शुभ कृपादृष्टी असणार आहे. तसेच आज शुक्र आपल्या राशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान असणार आहे. शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेशाने आज मालव्य राजयोगाची निर्मिती होत आहे. हा राजयोग राशीचक्रातील काही राशींसाठी अतिशय शुभ ठरणार आहे. या योगाने त्या राशींचे भाग्य उजळणार आहे. पाहूया आजच्या या ५ नशीबवान राशी नेमक्या कोणत्या आहेत.
मेष राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ असणार आहे. आज शुभ चंद्रभ्रमणात तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. आजपर्यंत करत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. मनासारख्या गोष्टी घडत असल्यामुळे आत्मविश्वास वाढेल. सामाजिक कार्यात रुची वाढेल. लोकहिताचे काम केल्याने समाजात मानसन्मान मिळेल. तुमची प्रतिष्ठा वाढेल. घरामध्ये सकारात्मक बदल घडून येईल. त्यामुळे वातावरण आनंददायक राहील. अनपेक्षित गोष्टींमधून धनलाभ होईल. त्यामुळे आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. मात्र कामाच्या ठिकाणी विनाकारण धडाडी दाखवणे टाळावे लागेल.
आज मालव्य राजयोगात मिथुन राशीसाठी बुधवारचा दिवस उत्तम असणार आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्वात उल्लेखनीय बदल घडून येईल. कामाच्या व्यापातसुद्धा जोडीदाराला पुरेसा वेळ द्याल. त्यामुळे नातेसंबंध आणखी मजबूत होतील. वैवाहिक आयुष्यात सुखसमृद्धी येईल. मनोरंजनाचे कार्यक्रम बघण्याची इच्छा होईल. घरामध्ये शुभ कार्य घडून येईल. त्यामुळे मनसुद्धा प्रसन्न राहील. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांची मर्जी प्राप्त होईल. त्याचा फायदा भविष्यात नक्की दिसून येईल. एखादी नवी योजना आखायला आजचा दिवस शुभ आहे. उद्योग-व्यापारात प्रगती होईल.
कर्क राशीसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. भूतकाळात हातातून निसटलेल्या संधी आज पुन्हा उपलब्ध होतील. रखडलेली कामे पूर्णत्वास जातील. तरुणांची लव लाईफ आणखी बहरेल. जोडीदारासोबत भविष्याच्या योजना आखाल. नोकरीत मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. आज कोणत्याही क्षेत्रात केलेली गुंतवणूक लाभदायक ठरणार आहे. एखाद्या गोष्टीतून आर्थिक फायदा होईल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ झाल्याने आत्मविश्वासात भर पडेल. कामानिमित्त प्रवास घडून येईल. कोणत्याही कामातून पटकन मोबदला मिळण्याची अपेक्षा ठेऊ नका. संयम ठेवल्यास सर्व सुरळीत होईल.
आजच्या मालव्य राजयोगाचा लाभ तूळ राशीलासुद्धा होणार आहे. काही दिवसांपासून अडकलेले पैसे आज परत मिळतील. त्यामुळे मनात उत्साह निर्माण होईल. दिवसभर अनुकूल वातावरण निर्माण होईल. विवाहित लोकांना गृहसौख्य लाभेल. घरातील वातावरण खेळीमेळीचे राहील. प्रेमीयुगलांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. सिंगल असणाऱ्यांना आपल्या आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. यातूनच नातेसंबंध वाढीस लागतील. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या बुद्धी चातुर्याचे कौतुक होईल. लोकांना आकर्षित करुन घ्याल.
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला जाणवेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मितभाषी स्वभावाने लोक आकर्षित होतील. महत्वाची कामे आज वेळेत पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. कलात्मक गोष्टींमध्ये आज स्वारस्य वाढेल. पैसे मिळवण्याचे विविध मार्ग आज तुमच्यासाठी खुले होतील. महत्वाच्या निर्णयांमध्ये कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. कुटुंबासोबत विविध मनोरंजनात्मक गोष्टी करण्यावर भर द्याल. जुन्या मित्रमैत्रिणींच्या गाठीभेटी जुळून येतील.