मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : या ५ राशींना शुक्रवार वैवाहीक सौख्याचा, भाग्योदयकारक दिनमान

Today lucky zodiac signs : या ५ राशींना शुक्रवार वैवाहीक सौख्याचा, भाग्योदयकारक दिनमान

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 29, 2024 02:58 PM IST

Lucky Rashi Today 29 march 2024 : आज २९ मार्च २०२४ शुक्रवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना लाभदायक दिवस जाईल. वाचा या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

लकी राशीभविष्य २९ मार्च २०२४
लकी राशीभविष्य २९ मार्च २०२४

आज शुक्रवार २९ मार्च रोजी, तूळ राशीनंतर चंद्र वृश्चिक राशीत जाणार आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून या दिवशी सिद्धी योग, सर्वार्थ सिद्धी योग आणि विशाखा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा लाभ मिळेल.

मेषः 

आज विवाह इच्छुकांचे विवाह जमतील. प्रेमप्रकरणामध्ये तरुणांना यश मिळेल. काही कामे अडली असतील तर ती पार पडतील. आत्मविश्वास वाढल्यामुळे नियोजित कामात चांगली प्रगती कराल. मान सन्मान वाढेल. मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. 

वृषभः 

आज महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. भाग्योदयकारक दिनमान आहे. आज आपणास नशीबाची साथ लाभेल. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. तिर्थक्षेत्री प्रवास घडतील. व्यवहारात आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. परमेश्वरवर विश्वास दृढ होईल. मानसिक स्वास्थ लाभेल.

कन्या: 

आज प्रेमीजनांना आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी करून दाखवण्याची संधी मिळेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. मानसन्मानात वाढ होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराला समजून घ्याल. मनोबल उंचावलेले असेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल.

तूळ: 

आज नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. कार्य क्षेत्रात प्रचंड झेप घ्याल. तरुण वर्गाला आपली आवडती व्यक्ती वारंवार भेटेल. कार्यक्षमता वाढणार आहे. आर्थिक लाभ चांगला होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा आधिक लाभ होईल. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल.

वृश्चिक: 

आज ग्रहांची साथ चांगली मिळेल. स्थावर इस्टेटीसंबंधी महत्त्वाचे निर्णय घेणार आहात. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. आपले प्रयत्न यशस्वी होतील. मान सन्मान मिळेल. विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील.

WhatsApp channel