मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs Today 29 March 2023 : कलाकारांना, विद्यार्थ्यांना यश मिळेल, नोकरीत पदोन्नती होईल
आजच्या नशीबवान राशी
आजच्या नशीबवान राशी (हिंदुस्तान टाइम्स)

Lucky Zodiac Signs Today 29 March 2023 : कलाकारांना, विद्यार्थ्यांना यश मिळेल, नोकरीत पदोन्नती होईल

29 March 2023, 6:52 ISTDilip Ramchandra Vaze

Lucky Zodiacs : आज काही राशीच्या व्यक्तींना लाभकारक दिवस आहे. मानसन्मान वाढेल, विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल, व्यापारात नव्या संधी चालून येतील.

राशीनुसार आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याची माहिती मिळते. प्रत्येक राशीची आपली अशी काही वैशिष्ट्य असतात. त्या वैशिष्ट्यांनुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे याचा आपण अंदाज बांधू शकतो. आज तुमच्या राशीत काय आहे हे आधी समजलं, तर त्यानुसार दिवस कसा असेल, याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. आज बुधवार २९ मार्च २०२३. आजच्या नशीबवान राशी कोणत्या आहेत त्यावर एक नजर टाकूया.

ट्रेंडिंग न्यूज

मेष रास 

केलेल्या कष्टाचं चीज होईल. व्यापारात उन्नती घडण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश मिळेल. आपण केलेली मेहनत फळाला येईल. अर्थकारणात शुभ दिवस आहे. कार्यक्षमतेत यश मिळेल. कलाकारांना प्रसिद्धी आणि यश मिळेल. नोकरदारांना आजचा दिवस अनुकूल आहे. कामात प्रगती होईल. केलेल्या मेहनतची गोड फळे चाखायला मिळतील. एकंदरीत शुभ दिनमान आहे.  

शुभरंगः तांबडा

कर्क रास

कोटुंबिक पातळीवर समाधानी आणि आनंदी असाल. कला क्षेत्रातल्या मंडळींना आज अत्यंत अनुकूल दिवस आहे. नव्या कल्पना मांडल्या जातील. व्यापाऱ्यांना नफ्यात वाढ होण्याचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. जुने मित्र भेटतील. आज मानसिक स्वास्थ लाभेल. आनंदायक वातावरण राहील. कलाक्षेत्रातील व्यक्तींना योगकारक दिवस आहे. नवीन प्रकल्प कामे मिळतील. जोडीदाराकडून अपेक्षेप्रमाणे साथ मिळेल. मन आंनदी राहील.आर्थिक लाभ होईल. नोकरीत कामे यशस्वी होतील.

शुभरंग: पोपटी

कन्या रास

व्यापारात नविन योजनाची सुरुवात होऊ शकते. जुनी येणी वसुल होतील. उत्पनाचे स्तोत्र वाढतील. राजकिय सामाजिक कलाक्षेत्रातील व्यक्तींना योग्य लाभ व मानसन्मान प्राप्त होईल. शैक्षणिक कार्यात बौद्धिक कार्यात यश लाभेल. परदेशगमन होईल. नोकरीत स्थान बदलाची उत्तम संधी आहे. बढ़ती व प्रमोशनचे योग आहेत. आपल्या कार्यक्षेत्रात वाढ व विस्तार होईल. दिवस यशस्वी असणार आहे.

शुभरंग: हिरवा

मीन रास

विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश मिळेल. कला क्षेत्रातल्या मंडळींचा मानसन्मान वाढेल. जोडीदार योग्य साथ देईल. पदोन्नती आणि प्रगती होईल. व्यापार कारखानदार वर्गात व्यवसायात वाढ होईल. आत्मविश्वासपूर्ण वाटचाल कराल.अनुकुल वातावरण असणार आहे. मनोबल उंचावेल. मनशांती लाभेल. प्रगतीकारक काळ आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन क्षेत्रात यश संपादन करण्याची संधी मिळेल. प्रेमप्रकरणात यश येईल.

शुभरंग: जांभळा

विभाग