आज २९ जून २०२४ शनिवार रोजी, चंद्र गुरूच्या मीन राशीत प्रवेश करत असून मिथुन राशीमध्ये सूर्य आणि शुक्राच्या संयोगामुळे शुक्रादित्य योग तयार होत आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथी असून या दिवशी शुक्रादित्य योगासह शोभन योग आणि उत्तराभाद्रपद नक्षत्राचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. या आहेत आजच्या ५ लकी राशी.
आज अनुकुल घटना घडतील. जुने मित्र भेटतील. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. स्वप्नांच्या दुनियेतच वावराल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. साथीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. सामाजिक क्षेत्रातील व्यक्तीना प्रगती कारक दिवस आहे. नोकरी व्यवसायात समाधानकारक प्रगती राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. भागीदारीमुळे आर्थिक धनलाभ होतील. मन प्रसन्न राहील.
आज घरामध्ये मंगलकार्य ठरल्यामुळे उत्साही आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. साहित्यिक समारंभात भाग घ्याल. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. सर्वच स्तरातील नाते संबंधात स्नेह निर्माण होईल. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल.
आज अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. नवीन योजनांचे व्यवसायात स्वागत होईल. तुमच्या व्यक्तीमत्त्वात सुधारणा कराल. त्याबरोबरच उत्तम बोलण्याची साथ जर व्यवहारात दिलीत तर फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. नातेवाईकांकडून सहकार्य लागेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल.
आज अडलेली कामे पार पडतील. योग्य वेळी समयसूचकता दाखवाल. फायद्याच्या गोष्टी ओळखाल. करिअरमध्ये महत्त्वाच्या संधी येतील. कामाचे उत्तम नियोजन खूप उपयोगी पडेल. दुसऱ्यावर विसंबून राहू नये. घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे ऐकावे लागेल. आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. ऊर्जादायी आणी प्रचंड उत्साहपूर्ण दिवस असेल.
आज अनेक वाटा खुल्या होतील. चैनीच्या वस्तू खरेदी करण्याकडे कल राहील. इतरावर आपला प्रभाव राहील. नोकरी व्यवसायात पूर्वी केलेल्या कामाचा लाभ मिळेल. कामकाजात वेळेवर घेतलेले निर्णय फायदेशीर ठरणार आहेत. एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका. वारसाहक्काने सांपत्तिक मदत मिळेल. भागीदारीत लाभ होतील. स्वसंपादित धनाचा उपभोग घ्याल. मौल्यवान वस्तुची खरेदी कराल. मित्रमैत्रिणीत स्नेह वाढेल.