मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs: विघ्नहर्ता संकष्टी चतुर्थीला या ५ राशींचे विघ्न हरेल, यशाचा आलेख उंचावेल

Today lucky zodiac signs: विघ्नहर्ता संकष्टी चतुर्थीला या ५ राशींचे विघ्न हरेल, यशाचा आलेख उंचावेल

Priyanka Chetan Mali HT Marathi
Jan 29, 2024 12:37 PM IST

Lucky Rashi Today 29 january 2024 : आज २९ जानेवारी २०२४ सोमवार रोजी, ग्रह-नक्षत्राचा शुभ संयोगात कोणत्या ५ राशींवर गणपती बाप्पा प्रसन्न होईल, जाणून घ्या या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

lucky zodiac signs today 29 january 2024
lucky zodiac signs today 29 january 2024

आज सोमवार २९ जानेवारीला चंद्र सिंह राशीनंतर कन्या राशीत जाणार असून, शनि आणि चंद्र एकमेकांपासून सातव्या भावात असल्यामुळे समसप्तक योग तयार होत आहे. तसेच आज पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी असून, या तिथीला गणेश संकष्टी चतुर्थी व्रत पाळले जाते. गणेश संकष्टी चतुर्थी तिथीच्या दिवशी समसप्तक योग, शोभन योग आणि पूर्वा फाल्गुनी नक्षत्र यांचाही शुभ संयोग होत असल्याने संकष्टी चतुर्थी तिथीचे महत्त्वही वाढले आहे. अशात या ५ राशींवर खास गणेश कृपा राहील.

मिथुन: 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात उत्तम बुद्धीमत्तेचा योग्य वापर कराल. एखादा धाडसी निर्णय घ्याल. नवीन योजना राबविण्यात यश लाभेल. उच्च शिक्षण घेणाऱ्यांना शुभ संधी मिळतील. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. झालेले बदल जितके लवकर आत्मसात कराल तेवढा यशाचा आलेख उंचावेल. प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. वरिष्ठ पदावर पदोन्नती होईल. मानसन्मान वाढेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. नवीन भागीदारासोबत व्यवसाय प्रारंभ करण्यासाठी शुभ दिवस आहे. कुंटुंबात सुख-समाधानाचे वातावरण राहील.

कर्कः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात युक्तीने काही गोष्टी केल्या तर यश मिळू शकेल. नोकरीत आर्थिक बाबतीत वृद्धी होईल. भांवडाकडून सहकार्य लाभेल. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ होईल. वाहन व घर खरेदीचा योग आहे.  पराक्रम व क्षमतेमुळे यश व फायदा होईल. व्यापार उद्योगात प्रगती राहील. बौद्धिक आणि शैक्षणिक कार्यात मान-सन्मान मिळेल. कुंटुंबासोबत तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. उद्योग क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळण्याचे योग आहेत.

कन्या: 

आज वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. त्यामुळे वेळात वेळ काढून जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. भाग्याची साथ चांगली मिळेल. त्यामुळे नवीन योजना राबवायला हरकत नाही. उत्तम दिवस आहे. आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होईल. कामकाजाचा विस्तार होईल. नवीन कल्पना नक्की मांडा. व्यापारात नवीन योजनेत भागीदाराकडून मदत मिळेल. 

मकरः 

आज विद्यार्थ्यांना उच्चशिक्षणासाठी अनेक मार्गांनी संधी येतील. परदेशासंबंधी काही अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग येतील. एखादी गोष्ट भाग्यात असली तर ती मिळते याचा प्रत्यय येईल. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. वरिष्ठ तुमचे कौतुक करतील. भाग्योदयकारक दिवस आहे. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आपल्या हातून आध्यात्मिक सामाजिक कार्य घडेल. धार्मिक स्थळी प्रवास घडेल. 

मीनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगामुळे जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायातील समस्या सोडविण्याचे विविध पर्याय उपलब्ध होतील. प्रेमीजनांना अनुकूल काळ आहे. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. व्यापारात लाभ होईल. नोकरीमध्ये महत्त्वाची कामे स्वत:च करा. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील. यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. अपेक्षित यश लाभेल. पत्नीची साथ मिळेल.