आज गुरुवार २९ ऑगस्ट रोजी, चंद्र मिथुन राशीतून भ्रमण करत आहे. तसेच आज श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी असून, या तिथीला अजा एकादशीचे व्रत पाळले जाते. अजा एकादशी व्रताच्या दिवशी सिद्धी योग, व्यतिपात योग आणि आर्द्रा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ५ राशींना आज होणाऱ्या शुभ योगाचा लाभ मिळणार आहे.
आज प्रिय व्यक्तींची भेट होण्याचे योग आहेत. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक गोष्टीत जास्त आवड निर्माण होईल. खरेदी विक्रीच्या व्यवहारात फायदा होईल. व्यापार उद्योग तेजीत राहतील. कार्यप्रणाली व कल्पनाशक्ती यात सुधारणा होईल. आर्थिक स्थिती संतोषजनक राहील. प्रयत्नाच्या तुलनेत लाभ अधिक होईल.
आज आपल्याला सहकार्य लाभणार आहे. व्यापारीवर्गाकरिता आकस्मिक धनलाभ होईल. गृहस्थी सौख्य लाभेल. नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जातील. सगळीकडे धडाडी दाखवाल. आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने कराल. दूरच्या प्रवासाचे योग येतील. प्रिय जनांच्या भेठीगाठी होतील. साहित्य आणि लेखन याची आवड निर्माण होईल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी प्राप्त कराल. नवीन कल्पना नक्की मांडा. फायदा होईल. आज यश निश्चित लाभेल.
आज वारसा हक्काची प्रकरण मार्गी लागेल. मान्यवर व मोठ्या व्यक्तींचा सहवास लाभेल. नोकरी व्यवसायात घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांपासून लाभ होईल. आर्थिक लाभ मोठ्या प्रमाणात होतील. प्रत्येक कामाचे खोलवर चिंतन कराल. प्रसिद्धी मिळवाल. भरभराटीचा दिवस आहे. खेळाडू यशाचा शिखर गाठतील. तरुणवर्गास इच्छित नोकरी मिळेल. दूरदर्शीपणाने योग्य कामे होतील. व्यवसायातील वातावरण चांगले राहील. अचानक लाभ होण्याचे योग आहेत.
आज तुमची अध्यात्मिक साधना फळाला येईल. आत्मविश्वास द्विगुणित होईल. सामाजिक कार्यात रस घ्याल. नवीन उमेदीने कामाला लागा. इच्छित फळ मिळेल. परिवारात शुभ कामाचे आयोजन केले जाईल. व्यापारात परिस्थिती चांगली राहील. बेरोजगारांना रोजगाराची संधी प्राप्त होईल. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. कौटुंबिक जीवनात मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होण्याची शक्यता असून, वारसा हकाचे प्रकरण मार्गी लागेल. चांगल्या विचारांचा लाभ होईल. कौटुंबिक पातळीवर पत्नी व संततीसी मधुर संबंध राहतील. लांबच्या प्रवासाचे योग येतील. सुखी व्हाल.
आज कार्यक्षेत्रात उत्तम ठसा निर्माण करण्यास तुम्ही वरचढ ठरणार आहात. चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मूड राहील. नोकरीत योजलेले काम वेळेत पूर्ण होईल. प्रत्येक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. उत्पनात वाढ होईल. तिर्थक्षेत्री प्रवास घडेल. व्यापाराच्या दृष्टीने चांगला दिवस आहे. नवीन प्रकल्पात गुंतवणुकीसाठी व शुभ कार्यासाठी दिवस उत्तम राहील. कार्यक्षेत्रात अनेकांचे सहकार्य लाभेल. परदेशगमनाचा योग आहे. प्रवासातुन मोठे लाभ घडतील. आरोग्य उत्तम राहील.