आज शनिवार २८ सप्टेंबर रोजी, चंद्र कर्क राशीनंतर सिंह राशीत जाणार आहे. तसेच आज भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील इंदिरा एकादशी असून, या दिवशी पितरांच्या नावाने व्रत व श्राद्ध केल्याने पितरांना यमलोकातून मोक्ष प्राप्त होतो. इंदिरा एकादशीच्या दिवशी सिद्ध योग, साध्ययोग आणि आश्लेषा नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशींना आज शुभ योग तयार होत असल्याचा फायदा होईल.
आज प्रगतीची चिंता वाटेल. पूर्वी केलेल्या कामाची पावती मिळेल. आर्थिक पातळी वरील प्रश्न चुटकीसरशी सोडवाल. स्वतःसाठी चोखंदळपणे खरेदी कराल. साथीदाराचे सहकार्य लाभल्यामुळे मन प्रसन्न राहील. आत्मसन्मान वाढीस लागेल. अनुकुल घटना घडतील. मन प्रसन्न असल्याने तुमच्या नियोजीत कामात वेग येणार आहे. नोकरी व्यवसायात समाधान कारक प्रगती राहील. विद्यार्थ्यांची अभ्यासाची प्रगती उत्तम राहील. तीर्थक्षेत्री जाण्याचा योग आहे.
आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मध्यस्थांची मदत घ्यावी लागेल. घरामध्ये मनासारखी खरेदी कराल. त्यामध्ये चैनीच्या वस्तूंचा जास्त समावेश असेल. आनंदी वातावरण निर्माण होईल. वारसा हक्कातुन मिळणारी संपत्ती वास्तुविषयी काम सुरुळित पार पडणार आहेत. आपल्या कलागुणांना प्रोत्साहन मिळणार आहे. वाहन घर खरेदीसाठी शुभ दिवस आहे. प्रेमसंबंधामध्ये जोडीदारा बद्दल प्रेम भावना वाढेल. व्यवहार फायदेशीर ठरतील. मनात उर्जा आणि उत्साह वाढेल.
आज पूर्वी केलेल्या प्रयत्नांमुळे अनेक गोष्टींचे लाभ मिळणार आहेत. व्यवहारात फायदा होईल. एखादी आर्थिक गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अनुकूल अपेक्षित लाभदायक घटना घडतील. मेहनतीचे फळ मिळण्याचा योग आहे. नवदांपत्यास आनंदाची बातमी मिळेल. नातेवाईकांकडून सहकार्य लाभेल. आज गुंतवणुकीसाठी शुभ दिवस आहे. आर्थिक स्त्रोत वाढेल. नवीन वाहन खरेदीस चांगला दिवस आहे.
आज शुभ दिवस असणार आहे. सूचक स्वप्ने पडतील. स्वत:बरोबर दुसऱ्याचाही फायदा कराल. केलेल्या कामामुळे आर्थिक दृष्ट्या उन्नती होईल. नविन योजनेतून लाभ होईल. नोकरीत जबाबदारीत वाढ होईल. आपली कामे यशस्वीपणे पार पाडाल. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल. व्यापारात आर्थिक प्राप्तीत वाढ होईल. निर्णायक कामात यश मिळेल. आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याचे योग आहेत.
आज लाभदायक आर्थिक योजनांचा पाठपुरावा कराल. जुनी येणी वसूल होतील. काम सोपे कराल. घरातील लांबलेल्या कामांकडे लक्ष द्याल. आनंदी वातावरण लाभेल. व्यवहार यशस्वीरित्या हाताळाल. वेगवेगळ्या मार्गाने धनलाभ होतील. नवे मित्रमैत्रिणी भेटतील. दिवस उत्सहाचा आहे. प्रवासाचे योग घडतील. कुटुंबातील सुखद वातावरणात वृद्धी होईल. गुंतवणुक आपणास फायदेशीर ठरेल. उद्योग व्यवसायात नविन विचार नवीन विषय पुढे येतील. आर्थिक दृष्या खुपच उत्तम दिवस आहे.