मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : आजचा सिद्धी योग करणार चार राशींना मालामाल

Today lucky zodiac signs : आजचा सिद्धी योग करणार चार राशींना मालामाल

HT Marathi Desk HT Marathi
Nov 28, 2023 11:00 AM IST

lucky zodiac signs today 28 november 2023 : चंद्र आज शुभ नक्षत्रातून संक्रमण करत असून सिद्धी योग बनत आहे. या योगात आज चार राशी मालामाल होणार आहेत. कोणत्या आहेत या राशी?

Today lucky zodiac signs
Today lucky zodiac signs

 

वृषभ

चंद्र स्थिती अनुकूल असल्यानं दिवस चांगला जाईल. स्वकष्टाच्या कमाईचा उपभोग घ्याल. वडिलोपार्जित मालमत्तेचे प्रश्न सुटतील. कामानिमित्त दूरचा प्रवास घडेल. व्यवसायात योग्य वेळी घेतलेले निर्णय लाभदायी ठरतील. भागीदारीत व्यवसाय करत असाल तर अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. प्रेमप्रकरणात सावध राहा. खेळाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी संधी उपलब्ध करून देणारा दिवस आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जुन्या मित्रांची भेट होईल. शुभ रंगः गुलाबी शुभ दिशाः आग्नेय. शुभ अंकः ०४, ०८.

मकर

कौटुंबिक सौख्य लाभेल. बायको व मुलांकडून सुख मिळेल. नातेवाईकांकडून पैशाची मदत होईल. लिखाणाच्या क्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नव्या कल्पनांवर काम सुरू केल्यास यश निश्चित आहे. मित्रमंडळी मदतीला धावतील. नव्या कामाला सुरुवात करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसाय सुरळीत चालेल. सार्वजनिक क्षेत्रातील लोकांचा नावलौकिक वाढेल. प्रवासातून आर्थिक लाभ संभवतात. प्रतिस्पर्ध्यावर मात कराल.  शुभ रंगः निळा शुभ दिशाः नैऋत्य. शुभ अंकः ०५, ०८.

मिथुन

आजचा दिवस प्रसन्न असेल. मनावर कोणताही ताण नसेल. सहकुटुंब सहलीचा योग आहे. पती / पत्नीची भक्कम साथ मिळेल. एकमेकांच्या मदतीनं महत्त्वाचे निर्णय घ्याल. सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन योजनेवर काम सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. मौजमजेच्या वस्तू खरेदी करण्याकडं कल राहील. विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागेल. प्रेमात असाल तर गाडी पुढं सरकेल. प्रकृतीचा त्रास जाणवणार नाही. शुभ रंगः पोपटी शुभ दिशाः उत्तर. शुभ अंकः ०३, ०९.

धनु

धनु राशीच्या जातकांसाठी आजचा दिवस खास आहे. धनु राशीचा स्वामी गुरूचं पाठबळ लाभणार आहे. घर किंवा गाडी खरेदी विक्रीच्या व्यवहार लाभदायी ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशीर्वाद व प्रेम मिळेल. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. उद्योगधंदा सुरळीत चालेल. सामाजिक पत वाढेल. विद्यार्थीवर्गासाठी अनुकूल दिवस आहे. झेपेल एवढीच जबाबदारी खांद्यावर घ्या. शुभ रंगः पिवळसर शुभ दिशाः ईशान्य. शुभ अंकः ०६, ०९.

 

(डिस्क्लेमर : या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे सत्य आणि अचूक असेलच असं नाही. हिंदुस्तान टाइम्स मराठी तसा दावा करत नाही. अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)