हिंदू धर्मात प्रत्येक दिवसाला विशेष महत्व आहे. प्रत्येक दिवस कोणत्या ना कोणत्या देवी-देवतांना अर्पण करण्यात आला आहे. त्यामुळे दररोज विविध योग आणि तिथी जुळून येत असतात. आज ज्येष्ठ महिन्यातील पहिला मंगळावर आहे. हा मंगळावर जोतिष शास्त्रानुसार अतिशय खास असणार आहे. या मंगळवारला मोठा मंगळवार किंवा बुधवा मंगळवार असेदेखील संबोधले जाते. आजच्या दिवशी पवनपुत्र हनुमानाची तपस्या केली जाते. आजच्या दिवशी वाशी योग, ब्रह्म योग, गरजकरण आणि नवमपंचम सारखे मोठे योग जुळून येत आहेत. या योगांचा परिणाम राशीचक्रातील काही राशींवर अतिशय शुभ असणार आहे. पाहूया आजच्या या पाच नशिवबान राशी कोणत्या आहेत.
आज ज्येष्ठ महिन्यातील बुधवा मंगळवारचा पुरेपूर लाभ मेष राशीच्या लोकांना होणार आहे. दिवसभर मन उत्साही असल्याने एक वेगळाच आत्मविश्वास तुम्हाला जाणवेल. वडिलोपार्जित संपत्तीबाबत सुरु असलेले वादविवाद आज संपुष्ठात येतील. त्यामुळे मनाला समाधान लाभेल. शिवाय अनेक दिवसांपासून रखडलेली आर्थिक कामे मार्गी लागतील. उद्योग-व्यवसायात मनासारखा फायदा होईल. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थ्यांना भविष्यात नव्या संधी मिळण्याच्या दृष्टीने आज वाटचाल सुरु होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून कौतुक होईल. लिखाण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना लेखन प्रकाशित करण्याच्या विशेष संधी हाती लागतील.
आज ब्रह्म योग तयार होत असून, आजचा दिवस मिथुन राशीसाठी फलदायी ठरणार आहे. घरामध्ये तुमच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये तुमच्याबद्दल आदर वाढेल. आज वैचारिक दृष्टिकोन बाजूला ठेऊन व्यवहारिक वृत्तीने निर्णय घेतल्यास आर्थिक लाभ संभवतो. अनेक दिवसांपासून अडकलेले पैसे आज अचानक परत मिळतील. त्यामुळे मनात उत्साह निर्माण होईल. आज जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होऊन, नातेसंबंध आणखी मजबूत होतील. विवाहित जोडप्यांना आज प्रत्येक निर्णयात एकमेकांचा पाठिंबा मिळेल. कुटुंबातील जुने मतभेद दूर होऊन आनंदी वातावरण निर्माण होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी आज शुभ चंद्रभ्रमणात नवमपंचम योगाचा विशेष फायदा होणार आहे. आज व्यापार-उद्योगात उल्लेखनीय वाढ झालेली दिसून येईल. तुमच्या सामंजस्य आणि कष्टाळू वृत्तीमुळे समाजात चांगली प्रतिष्ठा लाभेल. तुमचे व्यक्तिमत्व आणखी सुधारेल. कोणत्याही कार्यात रेंगाळत न बसता पटकन निर्णय घेतल्यास लाभ होण्याची शक्यता आहे. कला क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल. आर्थिक स्थिती आज उत्तम राहणार आहे. अचानकपणे आनंदाची बातमी कानावर पडेल. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना मोठा आर्थिक फायदा आज मिळणार आहे.
आज बुधवा मंगळवारच्या दिवशी केतू आणि चंद्र यांचा संयोग घडून येत आहे. या युतीचा फायदा तूळ राशीलासुद्धा होणार आहे. कला आणि साहित्यक्षेत्रातील लोकांना मोठे व्यासपीठ मिळून राजाश्रय लाभेल. नोकरदार वर्गाला बढती मिळून पगारवाढ होईल. त्यामुळे मनात एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण होईल. जुन्या मित्र-मैत्रिणीच्या गाठीभेटी जुळून येतील.. त्यांच्या सहवासात दिवस चांगला जाईल. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास विशेष फायदा होईल. आज एखाद्या महत्वाच्या कामात भावंडांचे सहकार्य लाभेल.
आज ब्रह्म योगात वृश्चिक राशीसाठी मनाला समाधान लाभणाऱ्या घटना घडतील. अनपेक्षित मार्गाने आर्थिक फायदा होईल. अतिशय शुल्लक गोष्टसुद्धा आज तुम्हाला प्रचंड उत्साह देईल. नवा व्यवसाय सुरु करण्यासाठी आजचा दिवस शुभ आहे. समाजकार्यात हिरिरीने भाग घ्याल. तुमच्या कार्यामुळे लोकांवर तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक वेगळाच ठसा उमठवाल. जोडीदाराला नोकरीमध्ये बढती मिळण्याचा योग आहे. नातेवाइकांसोबत संबंध सुधारतील. घरामध्ये धार्मिक कार्य घडून येईल. अध्यात्मिक विषयात रुची वाढेल. मन प्रसन्न राहील.
संबंधित बातम्या