मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Today lucky zodiac signs : संकष्ट चतुर्थीला लक्ष्मी योग, या ५ राशींच्या अडचणी दूर करेल बाप्पा

Today lucky zodiac signs : संकष्ट चतुर्थीला लक्ष्मी योग, या ५ राशींच्या अडचणी दूर करेल बाप्पा

Priyanka Chetan Mali HT Marathi
Mar 28, 2024 02:02 PM IST

Lucky Rashi Today 28 march 2024 : आज २८ मार्च २०२४ गुरुवार रोजी ग्रह-नक्षत्राच्या शुभ योगात या ५ राशींना फायदेशीर दिवस होईल. वाचा या नशीबवान राशी कोणत्या आहेत.

नशीबवान राशी २८ मार्च २०२४
नशीबवान राशी २८ मार्च २०२४

आज गुरुवार २८ मार्च रोजी, गुरू आणि बुध चंद्रावर सातव्या बाजू असून चंद्राचा शुक्राशी नववा आणि पाचवा संयोग आहे, ज्यामुळे राजयोग तयार होत आहे. तसेच आज चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील तृतीया तिथी असून या दिवशी राजयोगासोबत हर्ष योग, लक्ष्मी योग आणि स्वाती नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने आजच्या दिवसाचे महत्त्वही वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार 5 राशींना आज शुभ योग तयार होत असल्याने त्यांना फायदा होणार आहे.

वृषभ: 

आज जोडीदाराची साथ चांगली मिळेल. नवीन घर स्थावर खरेदीचे योग येऊ शकतात. अध्यात्माविषयी श्रद्धा वाढेल. व्यवसायात मनाप्रमाणे कामे मिळतील. प्रवास घडेल. अनुकुल फळ प्राप्त होतील. मान सन्मान मिळेल. वाहन घर खरेदी करता योग आहे. व्यापारात नवीन बदल यशस्वी ठरतील. वडिलोपार्जित इस्टेटीतून लाभ होईल. आर्थिक मदत मिळेल. 

मिथुनः 

आज ग्रह-नक्षत्राच्या शुभ योग-संयोगात यशस्वी व्हाल. मनःशांती मिळेल. सहलीचे बेत ठरतील. नोकरीत आत्मविश्वास द्विगुणित होईल. कुटूंबात स्नेह वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात नावलौकिकता प्राप्त होईल. नवीन प्रकल्पाची वाढ व विस्तार वाढणार आहे. आर्थिक लाभ नक्की होणार आहे. मनोवांच्छित फळ मिळणार आहे.

सिंह: 

आज तडजोडीचे धोरण स्वीकारावे लागेल. आर्थिक उलाढाली यशस्वी ठरतील. विश्वासाला न्याय देण्यासाठी जीवाचं रान कराल. स्वत:च्या हिमतीवर कामे पूर्णत्वाला न्याल. पैशाची अडकलेली कामे मात्र पार पडतील. भावंडांची साथ चांगली मिळेल. नोकरीत बढतीची संधी आहे. कल्पनाशक्तीला वाव मिळेल. मानसिकता स्थिर ठेवा. आहारावर नियंत्रण ठेवावे. व्यसनापासून दूर राहा. 

तूळ: 

आज सहकार्य चांगले मिळणार आहे. तुमच्या जवळच्या लोकांना उत्साह वाटेल. प्रकृती अस्वास्थ्य थोडे जाणवेल. पूर्वी केलेल्या कार्याचा मोबदला मिळेल. विद्यार्थीवर्गानी अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे. उधारी वसुल होईल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवास सुखकर व लाभदायक होतील. गुंतवणुकीच्या योजना फायदेशीर ठरतील. उत्पनात सुधारणा होतील. 

वृश्चिकः 

आज काम करण्यास उत्साह येईल. वारसा हक्काने धनप्राप्तीची शक्यता राहील. संशोधन क्षेत्रात प्रगती कराल. आकस्मिक धनलाभाचा योग आहे. व्यापार रोजगारात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. जिवनाचा मनसोक्त आनंद घ्याल. कामाच्या ठिकाणी कौतूक केले जाईल. शुभकार्यात सामील व्हाल. मानसन्मान मिळेल. यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. आर्थिक गुंतवणुकीकरिता योग्य दिवस आहे. प्रतिष्ठीत व्यक्तींच्या गाठीभेटी होतील. 

WhatsApp channel