आज २८ जून २०२४ शुक्रवार रोजी, चंद्राचे भ्रमण गुरूच्या मीन राशीत होणार आहे. तसेच आज ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील सप्तमी तिथी असून या दिवशी सौभाग्य योग, रवियोग, शोभन योग आणि पूर्वभाद्रपद नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व वाढले आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार आज तयार होत असलेला शुभ योग मेष, कर्क, कन्या यासह इतर 5 राशींना लाभदायक ठरेल. या आहेत आजच्या ५ लकी राशी.
आज व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. नवनवीन कल्पना सुचतील. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. आवडत्या व्यक्तीच्या संपर्कात याल. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन घडेल. आपली कार्यक्षमता वाढणार आहे. कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील.
आज आत्मविश्वासाने परिपूर्ण असाल. आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. कलावंतांना संधी मिळतील. भक्ती आणि श्रद्धेची आर्द्रता जाणवेल. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील.
आज विरोधकांची मने जिंकाल. व्यापारात भागीदारीत फायदा होण्याचे योग आहेत. औद्योगिक क्षेत्रातील व्यक्तींना आज भरभरटीचा दिवस आहे. नवीन प्रस्ताव हाती येतील. कामे पूर्णत्वास जातील. व्यवहारिक समस्या दूर होतील.कामाचा दर्जा वाढवण्यावर तुमचा भर राहील. तुमच्या स्वभावाचा तुम्हाला फायदा होणार आहे. अनेक जणांचे सल्लागार बनाल. मानसिक अवस्था उत्तम राहणार आहे. नोकरीत अडकलेली कामे पूर्ण होतील. मान सन्मान मिळेल.
आज आपल्या कार्यक्षेत्रात भरभराट होणार आहे. कामकाजाचा विस्तार होईल. नोकरीत वरिष्ठांकडून मर्जी प्राप्त कराल. वैवाहिक जीवनात आनंदी वातावरण राहील. जोडीदारासाठी निश्चित वेळ द्याल. करमणुकीचे कार्यक्रम बघण्यात वेळ घालवाल. नवीन योजना राबवायला हरकत नाही. शासकीय सेवेतील मंडळीसाठी उत्तम दिवस आहे. भागीदाराकडून मदत मिळेल.
आज कष्टाचे चीज होईल. नवीन रोजगारात परिक्षेत व मुलाखतीत यश मिळेल. तुमच्या बुद्धीमत्तेवर वरिष्ठ खूष होतील. तब्येत खूष होऊन जाईल. सामाजिक मान सन्मान वाढेल. कार्यक्षेत्रात आर्थिक कौटुंबिक बाबतीत परिवर्तन घडणार आहेत. व्यापारात एखादा मोठा आर्थिक व्यवहार होण्याची शक्यता आहे. उत्तम मोबदला मिळण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या